Translate :

Sponsored

Baramati Election Result 2026 : बारामतीत विरोधकांना धक्का ! सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर : Sunetra Pawar Is Leading By Many votes In the Baramati Assembly By Election

बारामतीत विरोधकांना धक्का ! सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर.

Baramati Election Result 2026 : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

बारामती : 04-05-2026 

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची (Baramati Election Result 2026) मतमोजणी सुरू झाली असून, बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरूस्ताह राहिल्याने सुमारे 58.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत 71.86 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात तीन लाख 84 हजार 579 मतदार असून, त्यापैकी दोन लाख 24 हजार 87 मतदारांनी मतदान केले. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरूस्ताह राहील्याने सुमारे 58.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरूवातीलाच सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 26,773 मतांनी आघाडीवर आहेत. या आघाडीमुळे बारामतीत विरोधकांचे आव्हान सध्यातरी कमकुवत झाल्याचे दिसत आहे.

राहुरी पोटनिवडणुक: अक्षय कर्डिले यांचा एकतर्फी प्राभाव (Baramati Election Result 2026)

भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत पोटनिवडणुक होत आहे. येथे भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत अपेक्षित होती. अक्षय कर्डिले सध्या 14,711 मतांच्या मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.

निवडणुकीविषयी …(Baramati Election Result 2026)

या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न झाले होते, मात्र एकमत न झाल्याने मतदान प्रक्रिया राबवावी लागली. राहुरीतून एकूण 7 उमेदवार नशीब आजमावत आहेत. सद्यस्थतिी पाहता बारामती आणि राहुरी या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.

सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट (Baramati Election Result 2026)

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असताना, आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करते. आज हा निकाल जाहीर होत असताना, आदरणीय दादांच्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या असून आपण सर्वजण भावूक झालो आहोत. दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाच्या आनंदात कोणीही मिरवणूका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. बारामतीकरांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती  घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ही शेवट नाही, तर सुरूवात आहे, निश्चयाची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored