National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

National War Museum
Picture of Jyoti Bhalerao

Jyoti Bhalerao

संग्रहालयांचं पुणे शहर –

पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं (Museums in Pune) आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे केळकर, पेशवे आणि मराठा संग्रहालयं आहेत.

पारतंत्र्यकाळातील देशाचे नेते लोकमान्य टिळकांपासून ते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसेवक र.धो.कर्वे यांच्या वैयक्तिक वस्तूंचा संग्रह असणारे संग्रहालयं, देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांवरील वेगळे असे नॅशनल वॉर म्युजियम, आदिवासींवरील जरा हटके असे ट्रायबल संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे देशाचा आर्थिक आढावा दाखवणारे संग्रहालय अशा अनेक संग्रहालयांचा खजिनांच पुणे शहरात आहे. मिसलेनियस भारतच्या माध्यामातून शहरातील अशा विविध, वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालयांची सफर आपण करणार आहोत.

राष्ट्रीय युद्ध स्मारक, दक्षिण कमान (National War Museum), घोरपडी, पुणे – स्थापना – ऑक्टोबर १९९८

सांस्कृतिक आणि शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच पुणे शहर संग्रहालयांसाठीसुद्धा ओळखले जाते. केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय, बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, अशी अनेक नावाजलेली संग्रहालय आहेत. परंतु नॅशनल वॉर म्युझियम(National War Museum) हे असे एकमेव संग्रहालय आहे, जे लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. याचा प्रस्ताव इ.स. १९९६ मध्ये मांडण्यात आला आणि दोन वर्षात ते आकाराला येऊन ऑक्टोबर १९९८ मध्ये ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

ज्या शूरवीरांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांची शौर्यगाथा येथे अनुभवायला मिळते. हे संग्रहालय आपल्याला लष्कराच्या दक्षिण कमानच्या इतिहासाची सुरुवातीपासून ओळख करून देते. संग्रहालयाची मांडणी अतिशय सुसंगत आहे. आपल्या देशाच्या लढवैया सैनिकांची, त्यांच्या कार्याची आणि लढाईतील साहित्याची अतिशय निटनेटकी विभागणी करण्यात आलेली आहे. सैनिकी जीवनाविषयीची सामान्यजनांची उत्सुकता हे नॅशनल वॉर म्युजियम (National War Museum) हे संग्रहालय पूर्ण करते.

National War Museum

या संग्रहालयाचे (National War Museum ) मुख्य द्वारच आपल्याला आर्मीच्या जीवनाची ओळख करून देते. आत प्रवेश करताच आपल्या भारत देशाचा भव्य तिरंगा पाहून आपण रोमांचित होतो. समोरच लढाऊ विमानाची प्रतिकृती दृष्टिस पडते. संग्रहालयाच्या मुख्य आवारात शिवाजी महाराजांचा भव्य लक्षवेधी पुतळा आहे . आपला बराचसा वेळ बाहेरचा परिसर पाहण्यात जातो.

National War Museum

येथील मुख्य इमारतीचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात आंतरराष्ट्रीय युद्धाच्या वेळची छायाचित्रे, इतर देशांचे झेंडे,लष्कराची विविध चिन्हे, आपल्या लष्कराचे वेगवेगळ्या प्रदेशासाठी वापरण्यात येणारे झेंडेही येथे पाहायला मिळतात. तर दुसऱ्या भागात देशातील अंतर्गत संकटांमध्ये लष्कराने केलेल्या मदतकर्यांची छायाचित्रे व माहिती आहे. तसेच सैनिकांना दिली जाणारी विविध पदकेही येथे पाहायला मिळतात. मुख्य इमारती शिवाय येथे आणखी दोन दालनं आहेत. मराठा एम्पायर,राजस्थान एम्पायर, या विभागांमध्ये त्या त्या प्रदेशात पूर्वी होऊन गेलेल्या शूरवीरांची माहिती व त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत ही झाली संग्रहालयाची प्राथमिक ओळख.

संग्रहालयाविषयी सखोल माहिती –

हे संग्रहालय (National War Museum) पहाताना आपण मराठा एम्पायर (Maratha empire) गॅलरीपासून सुरवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati Shivaji maharaj) राज्यभिषेक सोहळ्याच्या मोठ्या पेंटिंगने या दालनाची सुरूवात होते. अफजल खानाबरोबरची भेट आणि त्यानंतरच्या त्याच्या वधाचे चित्रण करणारे पेंटींगही येथे लावण्यात आलेले आहे. समोरच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati Shivaji maharaj) आणि राजमाता जिजाबाई (Rajmata jijabai) यांचे चित्र आहे. संग्रहालयाचे (National War Museum) मुख्य तीन भाग आहेत. ते टप्प्या टप्प्याने तुम्ही फिरू शकता.

येथे कसे फिरावे यासाठी लाल रंगातील मार्गदर्शक बाण आपल्याला मार्गदर्शन करतात. दुसरी चित्र गॅलरी राजस्थानी व दक्षिण भारतातील राज्यकर्ते, ज्यात पृथ्वीराज चौहान, हिंदूंचा दुसरा शेवटचा राजा म्हणजे महाराणा प्रताप, राजा राजेंद्र पहिला, टीपू सुलतान आणि इतर अशा अनेक योद्ध्यांच्या बर्‍याच चित्रांचा समावेश आहे. तसेच हल्दीघाटीच्या युद्धाचे चित्रण करण्यात आलेले आहे.

हे संग्रहालय (National War Museum) आर्मी जीवनाशी निगडीत असल्याने येथे प्रत्येक बाबतीत त्यांची शिस्त, स्वच्छता दिसून येते. बाहेरच्या भागात अगदी नियोजीत पद्धतीने हिरवळ तयार करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी लढाईत वापरलेले टँक (रणगाडे) ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय लढाऊ विमानांच्या प्रतिकृतीही आपले लक्ष वेधून घेतात.

National War Museum

सैन्याची रचना समजावणारे दालन –

या संग्रहालयाचा शेवटचा पण महत्त्वाचा भाग म्हणजे मुख्य दक्षिणेकडील कमांड हे दालन होय. जे राष्ट्रपती सैन्य विभागातील सैन्याच्या रचनेच्या उत्पत्तीपासून आपल्याला माहिती पुरवते. याशिवाय सर्व भारतभरातील सर्व युद्ध स्मारकांची माहिती, त्याचे माहिती फलक आणि अगदी मशीन व रायफल गन प्रदर्शनात आहेत. येथे कोणी आपल्याला येथील माहिती देण्यासाठी कोणी मार्गदर्शक नाही ही कमी जाणवते. परंतु येथील फलकांमधे आपल्याला भरपूर माहिती वाचायला मिळते. फक्त त्यासाठी तुमच्याकडे निवांत वेळ असायला हवा. साधारण शांतपणे कमीतकमी एक ते दिड तास तरी तुमच्याकडे यासाठी वेळ असायला हवा. तेव्हाच तुम्ही येथे भेट द्यायला जा.

National War Museum

संग्रहालयाचा अंतिम भाग –

या संग्रहालयातील (National War Museum) शेवटच्या भागात एक लांबलचक कॉरिडोर आहे जो छायाचित्रांनी सजवण्यात आलेला आहे. अगदी एकुण एक चित्र पाहण्यासारखे आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये आपले सैनिक कसे काम करतात, त्यांच्या प्रयत्नांचे यात चित्रण आहे,विविध ऑपरेशन्स तसेच लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सैन्या अंतर्गत शिक्षण संस्था आणि इतर बर्‍याच गोष्टींचा चित्ररूपी कोलाज आपण मंत्रमुग्ध होत पहात रहातो. शेवटच्या ठिकाणी एक छोटेसे दुकान आहे. जिथे आर्मी जीवनाशी निगडीत स्मरणिका आहेत. जसे की कॉफी मग, कॉफी टेबल बुक, हिप फ्लास्क, टी-शर्ट आणि अगदी लहान विमान आणि हेलिकॉप्टरं, घड्याळे देखील आपण आठवण म्हणून खरेदी करू शकतो. शेवटी येथून बाहेर पडताना सात रणगाडे आपल्याला निरोप देण्यासाठी ठेवण्यात आलेले दिसतात.

National War Museum

संग्रहालयातील एक विशेष भाग –

दहशतवाद्यांविरूद्धच्या लढाईत आपले सैनिक कसे काम करतात, बाँम्ब निकामी करताना त्यांचा ड्रेस कसा असतो हे सामान्यजनांना समजावे म्हणून येथे पेंटबॉल श्रेणी आणि त्यांचे त्यावेळी वापरण्यात आलेले कपडेही ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यामागेच एका काचेच्या कपाटामध्ये श्रेणीच्या अगदी मागे मुन्यूशन्स गॅलरी आहे जिथे आपण मोठ्या आकारातील अग्नि व्ही, नाग, पृथ्वी मिसाईलच्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासह येथे युद्धात वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गन मशिन्स, त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बुलेट आपण पाहू शकतो. त्यातून आपल्याला युद्ध आणि त्याच्याशी निगडीत माहिती मिळते.

हे संग्रहालय (National War Museum) खूपच प्रेरणादायी आहे. प्रत्येक देशाभिमानी व साहसाची आवड असणाऱ्यांनी येथे आवर्जून भेट द्यायला हवी. विशेषतः लहान मुलांसाठी त्यांना आपल्या देशाच्या इतिङासाविषयी माहिती द्यायची असेल तर येथे आवश्य जा. या संग्रहालयात प्रवेशनिःशुल्क असून, ते घोरपडी पुणे येथे आहे. सकाळी साडे नऊ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी खुले असते.

याठिकाणाला भेट द्यायला कसे जाल ?

Author

ज्योती भालेराव.

1 thought on “National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998”

  1. ज्योति बेटी, सामान्य माणसांच्या आयुष्यातील साचेबद्द जीवन राहाणीला कलाटणी देऊन हा एक प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा वास्तू-मंदिरा बद्दलचा हा लेख.
    सुरुवातच सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्याच्या उदरात किती महान आणि उदात्त वास्तू, मंदिरे , वाडे आहेत ई. वारसा स्थळांचा उल्लेख करून पुण्याच्या एका महत्व पूर्ण ऐतिहासिक स्थळाबद्दल म्हणजे नॅशनल वॉर म्युझियम बद्धल प्रकाश टाकणारा हा लेख आपण खूप सुंदर रीत्या सादर केला आहे.
    आपल्या शूरसैनिकांच्या शौर्यगाथा, सांगणारे ही पवित्र वास्तू.
    येथिल सुसंगत मांडणी, स्वच्छता, निटनेटकेपणा यांचा विचार करून सुयोग्य विभागणी केलेले हे म्युझियम. दर्शनी विभागात आसमंतात फडकणा ऱ्या तिरंग्या ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ला वंदन करून आपण मराठा एम्पायर , राजस्थान एम्पायर विभाग क्रमाक्रमाने पाहातो.
    आंतरराष्ट्रीय युद्धचित्रे, विविध प्रकारचे झेंडे, सैनिकाना
    बहाल करण्यात येणारी विविध पदके, सैन्याची विविध टप्यावरील कार्ये विशेषतः संकटकाळी त्यांचे कार्य,
    इ. महत्व पूर्ण टप्पे आपल्या नजरेत येतात.
    राजस्थान विभागातील महाराणा प्रताप आणि इतर योध्यां बद्धलची माहीती पाहाणे एक पर्वणीच आहे.
    या संग्रहालयातील उल्लेखनीय बाब म्हणजे इथे उभे असलेले बाण रुपी मार्गदर्शक व माहीती फलक, हे सर्व पाहून/ वाचून कुठेही न चुकता रीती सर या संग्रहालया चा आस्वाद घेऊ शकतो जाताना आपल्या सोबत रणगाडे, लढाऊ विमाने इ. असंख्य वस्तूंचा आणि चित्रांचा एक भव्यपट आपल्या स्मरणात घेऊन येतो.
    बेटी खूप जीव लावून हा लेख आम्हा पर्यंत पोहोचविल्या बद्दल धन्यवाद

    Reply

Leave a Reply