Ketan Agarwal Murder : 18 जूनला केतन अग्रवाल या तरूणाचा त्याच्या नियोजित वधूने दरीत ढकलून खुन केला. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे केले जात आहेत. त्याती नियोजित वधू सिया गोयल हीने पोलिस तपासात तिला लग्न का करायचे नव्हते, याचे अनेक कारणं सांगितली आहेत. यातील एक कारण आहे की, केतनला टक्कल असल्याने, तो केसांचा वीग वापरत होता.
पुणे : 26-06-2026
पुण्याचे व्यावसायिक विशाल अग्रवाल (Ketan Agarwal Murder) यांच्या मुलाचा केतन अग्रवाल याची हत्या कऱण्यात आली. केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल हिला केतनचे टक्कल असणे पसंत नव्हते.
केतन डोक्यावर केसांचा वेिग वापरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच कारणामुळे सियाची केतनसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. त्यातूनच प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस तपासात समजले आहे की, केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. हीच बाब सिया आणि चेतन यांनी आपल्या कटासाठी वापरली अपघाताचा आभास निर्माण होईल अशा ठिकाणी नेून केतनला दरीत ढकलून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली.
तब्बल तीन वेळा लोहगडावर रेकी (Ketan Agarwal Murder)
पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, सिया आणि चेतन यांनी खून करण्यापूर्वी तब्बल तीन वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली. किल्ल्यावरील खोल दऱ्या, निर्जन ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणाहून ढकलल्यास अपघात वाटेल, याची पाहणी त्या दोघांनी केली होती.
यानंतर 14 जून रोजी सिया आणि केतन प्रथमच लोहगड किल्ल्यावर गेले. फिरत असताना एका ठिकाणी सियाने केतनला दरीत ढकल्याणाचा प्रयत्न केला. मात्र खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यावेळी संशय येऊ नये म्हणून सियाने,”साप आला होता” असे सांगून वेळ मारून नेली होती.
पहिला प्रयत्न होता हुकला (Ketan Agarwal Murder)
पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सियाने प्रियकर चेतन चौधरीला संपूर्ण योजना सांगितली. केतनला एकटीने दरीत ढकलणे शक्य होणार नसल्याचे तिने चेतनला सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून दुसरा कट आखला. त्यानुसार 18 जून रोजी केतन, सिया आणि चेतन लोहगड किल्ल्यावर गेले. संशय येऊ नये म्हणून चेतन काही अंतर राखून चालत होता. योग्य संधी मिळताच सियाने इशारा केला आणि चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचे तपासातून समोर आले आहे.
सुरूवातीला हा मृत्यू अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांच्या तपासात सिया आणि चेतन यांच्यातील संवाद, हालचाली घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय बळावला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.