Translate :

Sponsored

UGC-NET ReExam 2026, Big News : UGC-NET चे 3 पेपर झाले रद्द, जाणून घ्या कारणं आणि नवीन वेळापत्रक : UGC-NET 2026 Re-Examination Schedule

UGC-NET चे 3 पेपर झाले रद्द, जाणून घ्या कारणं आणि नवीन वेळापत्रक

UGC-NET 2026 : NTA ने (UGC-NET ReExam 2026) मधील इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी विषयांची फेरपरीक्षा 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

दिल्ली : 17-08-2026

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जूनमध्ये घेतलेल्या UGC-NET (UGC-NET ReExam 2026)  परीक्षेच्या तीन विषयांचे पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक गंभीर उणिवा आढळून आल्या आहेत. त्यानंतर ही परीक्षा परत घेण्याची घोषणा कऱण्यात आली आहे. ज्या विषयांची पुर्नपरीक्षा होणार आहे, त्यात इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्र या विषयांचा समावेश आहे. NTA ने ‘एक्स’ वर पोस्ट लिहून याबाबतची घोषणा केली आहे.

NTA नुसार इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्र या विषयांच्या पेपरशी संबधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन कऱण्यात आली होती. समितीने आपल्या तपासात तथ्ये, टायपिंग आणि भाषांतराशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी शोधून काढल्या आहेत. तपासात दिसून आले आहे की, अनेक प्रमुख विद्वानांच्या नावांचे स्पेलिंग चुकीचे होते. पुस्तकांच्या शीर्षकांमध्ये गडबड होती. प्रश्नांच्या मुख्य भागातही उणिवा आढळल्या.

समितीने आपल्या पडताळणीत व्याकराणाच्या चुका, लिंग आणि वचनाशी संबंधित उणिवा, विरामचिन्हांच्या गडबडी आणि प्रस्थांपित संकल्पनांसाठी नॉन स्टॅन्डर्ड शब्दांच्या वापराचा शोध लावला , जुन्या परीक्षांमध्ये विचारलेले अनेक प्रश्न या वेळी रिपीट कऱण्यात आले होते, असेही तपासात समोर आले आहे. त्यानंतर समितीने या तिन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याची शिफारस केली. ती मान्य करून एनटीएने पुन्हा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

UGC-NET 2026 फेरपरीक्षेचे वेळापत्रक  (UGC-NET ReExam 2026)

NTA च्या नवीन परीक्षा कार्यक्रमा अनुसार, UGC-NET 2026 ची पुर्नपरीक्षा 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. पहील्या दिवशी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंक इंग्रजी विषयाची परीक्षा होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत शिफ्टमध्ये कॉमर्स विषयाची परीक्षा आयोजित केली जाईल. पुढील दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत समाजशास्र या विषयाची परीक्षा होणार आहे.

कोणतेही नवीन शुल्क लागणार नाही.  (UGC-NET ReExam 2026)

NTA ने स्पष्ट केले की, UGC-NET 2026 च्या पुर्नपरीक्षेसाठी कोणतेही नवीन शुल्क लागणार नाही. या परीक्षेसाठी शहर, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राशी संबंधित माहिती NTA च्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. एजन्सीने म्हटले की, 84 विषयांचे निकाल ठरलेल्या वेळापत्रकानुसार जाहीर केले जातील आणि त्यावर 3 विषयांच्या फेरपरीक्षेचा कोणातही परिणाम होणार आहे.

कधी घेण्यात आली होती UGC-NET ची परीक्षा ? ( UGC-NET ReExam 2026 )

एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, या 84 विषयांच्या उमेदवारांसाठी JRF जागांचे वाटप, सहाय्यक प्राध्यापक पात्रता आणि पीएचडी प्रवेशासाठी ई-सर्टिफिकेट जाहीर कऱण्यात कोणताही उशीर होणार नाही. फेरपरीक्षेसाठी उमेरवारांनी NTAची अधिकृत वेबसाईट नियमतीपणे चेक करत रहावी. यापूर्वी NTA ने 22 ते 30 जून 2026 दरम्यान 87 विषयांसाठी UGC-NET जून 2026 परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. आता यापैकी 84 विषयांचे निकाल जाहीर केले जातील, तर 3 विषयांचे निकाल नंतर घोषित केले जाणार आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored