Translate :

Sponsored

Nida Murder Case, Shocking News, 2026 : अनेकदा वहिनीला समजावलं पण..शेवटी नणंदेनेच केली वहिनीची हत्या : Uttarpradesh Meerut Murder Case Solved Sister In Law Stabs Bhabhi Extramarital Affair Case

अनेकदा वहिनीला समजावलं पण..शेवटी नणंदेनेच केली वहिनीची हत्या.

Nida Murder Case: उत्तरप्रदेशमधील मिरत मर्डर केसचा छडा लावला आहे. ही केस म्हणजे मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि मोहाची आहे. कुंटुंबांमध्ये नात्यांचा आदर आणि मर्यादा आबाधित राहिल्या तर अशा केस पुन्हा होणार नाही. मिरत मधील नणंदेने केलेल्या वहिनीच्या हत्येमुळे दोन कुटुंब उद्वस्त झाली आहेत.

उत्तरप्रदेश : 15-07-2026

निदा हत्याकांड (Nida Murder Case) प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. निदाची हत्या तिच्या नणंदेनेच केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे. 12 जुलैला निदा नावाच्या महिलेची राहत्या घरातच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मंगळवारी या हत्याकांडाचा खुलासा करताना मृत निदाची नणंद रिमशा, तिचा पती उवैश यांना अटक केली. हत्येत वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे.

निदा हत्या प्रकरण काय आहे ? (Nida Murder Case)

उत्तर प्रदेश नणंद रिमशा, तिचा पती उवैश यांना अटक केली. हत्येत वापरलेला चाकू सुद्धा ताब्यात घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे. पोलीस तपासानुसार मृत निदाचे रिमाशाचा पती उवैशशी संंबंध होते. त्यावरून बऱ्याच काळापासून घरात वाद सुरू होते.

त्याच वादातून रविवारी 12 जुलैला रिमशाने किचनमध्ये ठेवलेल्या भाजी कापायच्या चाकूने निदावर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकऱणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पोलीस अधिकारी  संग्राम सिंह यांनी सांगितले की, 12 तारखेला निदाचं हत्या प्रकरण समोर आले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. लिसाडी गेट पोलीस ठाण्याने हत्याकांडाचा खुलासा केला आहे. पोलीस तपास आणि टेक्निकल सर्विलान्समधून हे समोर आले आहे की, मृत निदाची उवैश सोबत जवळील वाढली होती.

उवैश नात्यात निदाचा भाऊजी लागायचा. निदाच्या नवऱ्याच्या बहिणीचा तो नवरा होता. याच गोष्टीवरून नणंद रिमशा सतत निदाशी भांडायची. वहिनीची दुसऱ्याच्या नवऱ्याबरोबर ही जवळीक रिमशाला मान्य नव्हती. तिचा संसार संकटात होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊस उचलले.

निदाच्या छातीवर वार (Nida Murder Case)

गुन्हा घडला त्या दिवशी रिमशा दुपारी 12 वाजता माहेरी आली होती. तिचा नवऱ्यासोबत निदा जवळीक वाढवतेय, याच मुद्द्यावरून दोघींमध्ये भांडण झालं. वाद वाढल्यानंतर रागाच्या भरात रिमशाने किचनमधला चाकू उचलला व निदाच्या छातीवर वार केले. याच निदाचा मृत्यू झाला.

पोलीस चौकशीत रिमशाने आपला गुन्हा कबूल केला. रिमशाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू ताब्यात घेतला. या सगळ्या प्रकऱणात कोण कोण सहभागी आहेत, त्यांची भूमिका काय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored