Translate :

Sponsored

Maharashtra Politics, Shocking News, 2026 : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा भूकंप ! 12 नगरसेवक शिदें गटात जाणार ? अफवा की सत्य ? ठाकरे गटाचे थेट उत्तर : Nashik Thackeray Shiv Sena Corporators Joining Eknath Shinde Press Conference

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा भूकंप ! 12 नगरसेवक शिदें गटात जाणार ? अफवा की सत्य ? ठाकरे गटाचे थेट उत्तर.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे ) गटातील 10 ते 12 नगरसेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

नाशिक : 10-07-2027 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे (Maharashtra Politics )उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार आणि विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांना आपल्या बाजून वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आता नाशिकमध्ये नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवर शिवसेनेच्या (शिंदे गट) संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता  (Maharashtra Politics )

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ठाकरे गटातील 10 ते 12 नगरसेवकांना शिंदे गटात भरती कऱण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नगरसेवकांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्याचे वृत्त आहे. संबंधित नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी 5 कोटी रुपयांचा विशेष निधी देऊ कऱण्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, शिवसेनेचे उपनेते अजय बोरास्ते यांनी सांगितले की, हे ” ऑपरेशन टायगर’ नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती वाढत्या आकर्षणाचा परिणाम आहे. त्यांनी दावा केला की, केवळ नाशिकमधूनच नव्हे, तर राज्यभरातील अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत. बोरास्ते यांनी असेही सांगितले की, विधान परिषद निवडुकीदरम्यान विविध पक्षांचे नगरसेवक मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि आमदार सुहास कांडे यांच्या संपर्कात होते. पक्षात सामील होऊ इच्छिणाऱ्या कोणाचेही स्वागत आहे. त्यांनी असाही दावा केला की, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश अपेक्षित आहे.

ठाकरे गट शक्तीप्रदर्शन कऱणार  (Maharashtra Politics)

नाशिकमध्ये पक्षात फूट पडण्याच्या अफवांदरम्यान, ठाकरे गटानेही आपले शक्तीप्रदर्शन कऱण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या गटनेत्यांच्या कार्यालयात सर्व नगरसेवकांटी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे गट एकतेचा संदेश देऊ इच्छितो आणि पक्षातून संभाव्य बाहेर पडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत आहे.

रायगडावर शिवसनेला धक्का  (Maharashtra Politics )

रायगडातही राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. शिवसनेचे (शिंदे गट) माजी रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे आज खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील होणार आहे. या राजकीय बदलाचा रोहा तालुक्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत भाजपला यश ( Maharashtra Politics )

मुंबई महानगरपालिकेतही एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मानखुर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड 138 च्या एआयएमआयएम नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र चौकशीनंतर अवैध ठरवण्यात आले आहे. परभणीच्या जात पडताळणी समितीने कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यानंतर हे प्रमाणपत्र रद्द केले, ज्यामुळे त्यांची नगरसेवकपदाची नोकरी संपुष्टात आली.

रोशन शेख यांची हकालपट्टी झाल्याने, प्रभाग 138 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या भाजपच्या उमेदवाराची नगरसेवर होण्याची शक्यता आता अधिक वाढली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored