Translate :

Sponsored

Anganwadi Poshan Ahar, Good News, 2026 : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात असणार शाकाहारी पुलाव : A Major Change Has Been Made To The Nutritional Diet Provided At Anganwadi

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात असणार शाकाहारी पुलाव. ( फोटो -सोशलमीडिया )

Anganwadi Poshan Ahar : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर 2026 पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे.

बारामती : 22-07-2026

महिला व बालविकास विभागाने (Anganwadi Poshan Ahar) अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर 2026 पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश कऱण्यात आला असून खिचडीसोबत स्वतंत्र मसल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

महिला व बालविकास (Anganwadi Poshan Ahar) विभागाच्या सुधारित सूचनेनुसार पौष्टिक मूगडाळ, खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन-मिश्रण पाककृती पूर्ववत राहणार असून, भरडधान्ययुक्त-प्रथिन मिश्रण ऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश कऱण्यात आला आहे. या सुधारित आहाराचा लाभ अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना मिळणार आहे.

काय म्हणाल्या महिला व बालविकास समितीच्या सभापती (Anganwadi Poshan Ahar)

महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार योजनेतील पाककृतींमधील बदल करण्यामागे लाभार्थ्यांना अधिक पोष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहार आवडीने खावेत, यासाठी व्हेड पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश कऱण्यात आला आहे. – अंकिता पाटील, सभापती, महिला व बालविकास समिती “

जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 4 हजार 395 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत जवळपास 1 लाख 6 हजार बालके, तसेच गरोदर महिला व स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नोव्हेंबर व डिसेंबर 2026 महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट आहार मिळावा, या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टिग्रेन न्युट्री पफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये आ सुधारित ‘खाद्यसूची’ नुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored