Pune Girl Child Crime : पुण्याच्या पिंपळवाडी परिसरात 10 वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने सर्वत्र धक्का बसला आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
पुणे : 20-08-2026
पुणे परत एकदा चिमुरडीवरील अत्याचारामुळे (Pune Girl Child Crime) हदरले आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर आरोपींच्या मनात भिती बसेल आणि बलात्काराचे प्रमाण कमी होईल अशी आशा होती. मात्र पुण्यात एकदा अशीच दुर्देवी घटना घडली आहे. पुण्याच्या पिंपळवंडी परिसरातून बलात्कार आणि हत्येची नवीन घटना समोर येत आहे. आरोपीने चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करून गळा दाबत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. रहिवाशांनी महामार्ग रोखला असून पोलिसांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
आरोपीला फाशी दिल्याशिवास आणि मुलीला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.
Table of Contents
काय आहे घटनाक्रम (Pune Girl Child Crime)
बालिकेवर केलेल्या बलात्कार आणि हत्येच्या या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 25 वर्षांच्या तरूणाला संशयावरून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ओळखीचा फायदा घेत मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. पोलिसांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता आहे असं समजून जेव्हा तिचा शोध घेतला जात होता तेव्हा संशयित यात सामील होता. त्याच्या कृतीतून पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्वरीत आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केली.
पोलिसांच्या या चौकशीतच खरं प्रकरण उघडकीस आलं.(Pune Girl Child Crime)
पिडीत मुलगी ही शेतमजूर घरातील होती. सुरूवातीला तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. 10 वर्षांची ही चिमुरडी आजारी होती. त्यामुळे ती मंगळवारी शाळेत गेली नव्हती. पोलिसांचा अंदाज आहे की, दुपारी घरी आई-वडील नसताना आरोपीने याचा फायदा घेतला आणि तिच्यासोबत दुष्कृत्य केले.
आरोपीच्या जबाबाने मृतदेह सापडण्यास मदत (Pune Girl Child Crime)
कुटुंबीय जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात मुलगी आढळली नाही. अशात कुटुंबाने आजूबाजूला, नातेवाईकांकडे मुलीची चौकशी केली. बराच वेळ शोधूनही जेव्हा मुलगी सापडली नाही तेव्हा आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडून शोधमोहिम सुरू असताना आरोपी देखी त्यांच्यात सहभागी होऊन मुलीचा शोध घेत होता. तथापि, त्याच्या कृतीतील विसंगती पाहून पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि खरं सत्य उघडकीस आलं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान संशयित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर लेंडे स्थळ परिसरातील एका नाल्याजवळील झाडाखालून मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याने मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याने स्पष्ट केले. पोलिसांनी सध्या मुलीच्या मृतदेहाला ताब्यात घेतेल आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेहाला रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. फॉरेंसिक टीमने घटनास्थळी जाऊन आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत. आरोपीचा जबाब आणि या पुराव्यांच्या आधारावरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले दुःख व्यक्त (Pune Girl Child Crime)
या प्रकरणाविषयी दुःख व्यक्त करताना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा कऱण्याची मागणी केली. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी अशी विनंती केली. तसेच, सरकार पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत. त्या लवकरच कुटुंबाला भेटणार आहेत.