Nagpur Grandmaster Raunak : नागपूरच्या रौनक साधवानी यांनी शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. जाणून घेऊ याविषयी.
नागपूर : 10-08-2026
नागपूर शहरासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. शहराचा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने (Nagpur Grandmaster Raunak) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नेदरलँडमधील व्लिसिंगने येथे 1 ते 8 ऑगस्टदम्यान झालेल्या प्रतिष्ठित शेल्डेमोंड इंटरनॅशनल चेस स्पर्धा 2026 विजेतेपद त्याने पटकावले. अव्वल मानांकित रौनकने 9 फेऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत अपराजित राहून 9 पैकी 7.5 गुण मिळवले आणि विजेतेपद संपादन केले.
रौनकचा विजेतेपदाचा प्रवास सोपा नव्हता. एका सामन्याचा कालावधी सुमारे साडेपाच तास चालला. रौनक आणि इंग्लडचा ग्रँडमास्टर डॅनियल हॉवर्ड यांचे गुण समान (7.5-7.5) होते. मात्र, टायब्रेकच्या आधारे रौनकला पहिले स्थान मिळाले. दोघांमधील सामन्याच्या निकालामुळे रौनकला विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी मिळाली.
अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उतरलेल्या रौनकने दबावाखाली सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ करीत मानांकन सार्थ ठरविले. शेल्डेमोंड इंटरनॅशनल चेस स्पर्धा ही नेदरलँडमधील प्रतिष्ठित खुल्या बुद्धीबळ स्पर्धापैकी एक मानली जाते. 2026 मधील स्पर्धा व्लिसिंगेन येथील शेल्डेमोंड कॉलेजमध्ये पार पडली.
स्पर्धेविषयी (Nagpur Grandmaster Raunak)
शेल्डेमोंड म्हणजे Scheldemond Chess Tournament ही आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा आहे. ही आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धा आहे. यात विविध देशातील Grandmaster (GM), International Master (IM) आणि FIDE Master (FM) सहभागी होतात. उपलब्ध सहभागी यादीत भारताचा GM रौनक साधवानी याचे नावही आहे. त्याची FIDE रेटिंग 2634 आहे.
काय म्हणाले रौनक साधवानी ? (Nagpur Grandmaster Raunak)
88 हे विजेतेपद माझ्यासाठी अत्यंत खास आहे. कोणतीही स्पर्धा जिंकणे हा नेहमीच संस्मरणीय अनुभव असतो आणि त्यातून आत्मविश्वास वाढतो. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली, याचा आनंद आहे. महत्त्वाच्या क्षणी शांत राहणे आणि छोट्या आघाडीचे विजयात रुपांतर करणे हेच सर्वात महत्त्वाचे ठरले. टायब्रेक नेहमीच कठिण असतात. मात्र, यावेळी निकाल माझ्या बाजूने लागला. अव्वल मानांकित खेळाडू असल्याने दबाव होता. परंतु, प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित केले. आता देशासाठी आणखी अधिक विजेतेपदे जिंकणे हेच माझे पुढील ध्येय आहे. असे रौनक साधवानी याने सांगितले.