Translate :

Sponsored

UPSC Mains 2026, Big News : UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’गोष्टींची घ्या विशेष काळजी ! : UPSC Mains 2026 Admit Card Exam Date

UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना 'या'गोष्टींची घ्या विशेष काळजी .

UPSC Mains 2026 : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षेची तारीख, ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया आणि परीक्षेच्या दिवशी सोबत ठेवायच्या कागदपत्रांची माहिती जाणून घ्या.

दिल्ली : 11-08-2026

युपीएससी मेन्सची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा 2026 च्या तारखांची घोषणा कऱण्यात आली आहे. ही परीक्षा 21 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत (UPSC Mains 2026) आयोजित केली जाणार आहे.

अहवालांनुसार, यूपीएससी मुख्य परीक्षेचे ॲडमिट कार्ड ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या साधारण एक ते दोन आठवडे आधी जाहीर केले जाऊ शकते. जे उमेदवार प्रीलिम्स परिक्षेत उत्तीरण झाले आहेत, तेच मुख्य परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. त्यामुळे सर्व उमेदवारांना आयोगाची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ॲडमिट कार्ड जाहीर होताच ते वेळेवर डाऊनलोड करता येईल.

ॲडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची पद्धत  (UPSC Mains 2026)

ॲडमिट कार्ड डाऊनलोड कऱण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर, म्हणजेच upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जावे लागेल. वेबसाईटच्या होमपेजवर “ई-ॲडमिट कार्ड” किंवा “ॲडमिट कार्ड’ या सेक्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिथे दिलेल्या पर्यायांपैकी ‘Civil Services (Main) Examination 2026’ निवडावा लागेल.

पुढील पेजवर उमेदवारांना त्यांची रजिस्ट्रेशन आयडी किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर स्क्रिनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून ‘सबमिट’ बटण दाबावे लागेल. सबमिट करताच स्क्रिनवर ॲडमिट कार्ड दिसेल. यामध्ये उमेदवाराचे नाव, फोटो, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची इतर महत्त्वाची माहिती दिलेली असेल.

डाऊनलोड केल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या (UPSC Mains 2026)

ॲडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर सर्वात पहिले काम म्हणजे त्यातील सर्व माहिती, जसे की नाव, फोटो, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख काळजीपूर्वक तपासून घेणे, जर काही चूक आढळल्यास, त्वरीत आयोगाशी संपर्क साधावा, जेणेकरून परीक्षेपूर्वी ती दूरूस्त करता येईल.

परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना ॲडमिट कार्डची प्रिंट कॉपी आणि एक वैध ओरिजिनल फोटो ओळखपत्र ( उदा.मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा तत्सम वैध ओळखपत्र) सोबत नेणे अनिवार्य आहे. ॲडमिट कार्ड आणि ओळखपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर रिपेर्टिंग टाइमच्या किमान एक तास आधी पोहोचावे, जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored