Translate :

Sponsored

Divya Deshmukh Arjun Puraskar, Great News, 2026 : नागपूरच्या वंडरगर्ल दिव्याला अर्जुन पुरस्कार जाहीर : Nagpur Wonder Girl Divya Named For The Arjun Award

नागपूरच्या वंडरगर्ल दिव्याला अर्जुन पुरस्कार जाहीर.

Divya Deshmukh Arjun Puraskar : नागपुरची युवा बुद्धीबळपटू दिव्या देशमुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उत्कृष्ट क्रीडा कामगिरीचा दाखल घेत दिव्याला प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्या या यशामुळे नागपूरसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

नागपूर : 19-08-2026 

बुद्धीबळाच्या पटावर आक्रमक आणि कल्पक खेळाने जगात ठसा उमटवणारी नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार (Divya Deshmukh Arjun Puraskar) जाहीर झाला. केंद्र सरकारने पुरस्कराची घोषणा केली. या यशामुळे नागपूरसह महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सध्या दिव्या अमेरिेकेत खेळत आहे. अर्जुन पुरस्कार मिळणारी दिव्या नागपूरची दुसऱी खेळाडू ठरली आहे.

या पुरस्काराबद्दल दिव्याची आई डॉ.नम्रता देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिव्याची मोठी उपलब्ध व आतापर्यंतच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी देशाला गौरव मिळवून देत असल्याचा सर्वाधिक आनंद असल्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

अर्जुन पुरस्कार मिळणे हा कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. दिव्याला जागतिक स्तरावर नागपूरची कन्या म्हणून ओळखले जाते, ही त्यांच्यासाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे. राज्याचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कारानंतर लगेचच अर्जुन पुरस्कारासाठी निवड होणारी ती नागपूरची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

दिव्याची ठळक कामगिरी  (Divya Deshmukh Arjun Puraskar)

जन्म : 9 डिसेंबर 2005, नागपूर, महाराष्ट्र

2010 मध्ये वयाच्या 5 व्या वर्षी तिने पहिल्यांदा खेळायला सुरूवात केली.

10 वर्षांच्या आत ती जिल्ह्यास्तरीय खेळाडूपासून महिला ग्रॅंडमास्टर बनली

2021 मध्ये ग्रँडमास्टर ही पदवी मिळवणारी ती एकमेव महिला ठरली.

2022 मध्ये तिला इंटरनॅशनल मास्टर (आयएम) पदवी मिळाली.

2024 ऑक्टोबर मध्ये तिचे सर्वोच्च रेटिंग 2501 होते.

2025 जूनपर्यंत ती फिडे रॅंकिंगमध्ये महिलांच्या गटात भारतातील चौथी सर्वोत्तम खेळाडू होती (आयएम रँक 18, रेटींग 2463)

2025 टाटा स्टिल इंडियामध्ये तिने महिलांच्या रॅपिड स्परर्धेत भाग घेतला आणि हरिका, यतिका, हम्पीसारख्या खेळाडूंना पराऊत केले.

19 जून 2025 रोजी चीनची जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू होउ यिफानला हारवून लंडन्चाय रोझी येथे झालेल्या जागतिक रॅपीड आणि ब्लिटझ सांघीक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.

दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार मिळाल्याने नागपूर शहरातील मान आणखी उंचावली आहे. अवघ्या 20 व्या वर्षी तिने मिळविेलेल्या हे यश शहरातील इतर खेळाडूंसाठी विशेषतः उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन. – डॉ.पियुष अंबुलकर, क्रिडा अधिकारी, मनपा

नागपूर शहरातील अर्जुन पुरस्कार विजेते  (Divya Deshmukh Arjun Puraskar)

  • नाव                                                     प्रकार
  • नीता दडवे.                                           कबड्डी
  • विजय मुनीश्वर                                       ॲथलेटिक्स, पॉवरलिफ्टिंग
  • जोगिंदरसिंग बेदी                                   ॲथलेटिक्स
  • ओजस देवतळे                                       आर्चरी
  • दिव्या देशमुख                                        बुद्धीबळ

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored