Translate :

Sponsored

Eknath Shinde Chakan MIDC, Good News, 2026 : एकनाथ शिंदेंनी केले चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन : Eknath Shinde On Chakan MIDC Pune News

एकनाथ शिंदेंनी केले चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, दिले 8 आश्वासने.

Eknath Shinde Chakan MIDC : चाकण-शिक्रापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे येथील उद्योग दुसरीकडे हलवण्याचे संकेत देण्यात येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता, शासनाने समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

पुणे : 24-08-2026

चाकण शिक्रापूर येथी उद्योजकांचा रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ( Eknath Shinde Chakan MIDC )  या प्रश्नांना सोडवण्यासाठी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणला भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा व्यक्तीशः आढावा घेतला. चाकण ओद्योगिक क्षेत्रात एम-60 हार्डनरचा वापर करून खड्डे कसे बुजवले जात आहेत त्याची एकनाथ शिंदेंनी पाहणी देखील केली.

चाकण-शिक्रापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासनाने आता विविध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. काल चाकणमध्ये झालेल्या बैठकीस उद्योजकांच्या प्रतिनिधींशी एकनाथ शिंदेंनी संवाद साधला. तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजकांचे  समाधान झाले आहे. चाकण बाहेर उद्योग नेण्याबाबत त्यांचे मतपरिवर्तन झाले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ? ( Eknath Shinde Chakan MIDC )

उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन झाला असून, दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या बुधवारी विशेष बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

चाकण औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या वाहनांची एन्ट्री आणि एक्झिट दोन्ही सुलभरित्या व्हावी यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या 54 किमी मार्गाची दुरूस्ती, नाशिक फाटा ते राजगुरू नगर रस्ता, एमआयडीसी आणि पीएमआरडीए क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बांधणीला गती देण्यात येणार आहे.

  • चाकण औद्योगिक क्षेत्रात रस्ते बांधतना सर्व यंत्रणांनी एकत्रित आराखडा तयार करून, फुटपाथ, युटीलीटी आणि सायकल ट्रॅक तयार करावेत.
  • चाकणमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांचा प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी याच क्षेत्रात क्लस्टरच्या माध्यमातून वसाहती तयार करण्याचा विचार केला जाईल.
  • उद्योजकांचा विविध प्रश्न सोडवण्यासाठी मैत्री ॲप्लिकेशनचा वापर करावा.
  • उद्योजकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी यापुढे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि इतर अधिकारी आठवड्यातून एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि इतर अधिकारी आठवड्यातून एक दिवस उपलब्ध असतील.
  • निगडी ते चाकण, चाकण ते राजगुरूनगर, तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रो प्राधिकरणाला दिले.
  • वीज पुरवठा, पोलीस अधिकारी तसेच पाणीपुरवठ्याचे प्रश्नही तातडीने सोडवण्यात येतील असे सांगून उद्योजकांच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले आहे.

काय आहे मुळ समस्या ? (Eknath Shinde Chakan MIDC)

चाकण एमआयडीसी ही एक महत्त्वाची एमआयडीसी आहे. येथे मर्सिडीज बेंझ, फॉक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण MIDC ची एक ओळख आहे. पण इथले खड्डे, दररोजची होणारी  वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला कुलुप लावण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण एमआयडीसीमधील रस्त्यांचे खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी कंपन्या स्थलांतरित कऱण्याच्या इशारा दिला आहे.

चाकण एमआयडीसीमधील रस्त्यांचे खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी कंपन्या स्थलांतरित  करणार असल्यांच उद्योजकांनी सांगितलं होतं. चाकण एमआयडीसी स्थलांतरित करणार असल्याचं उद्योजकांनी सांगितले होते. यानंतर समस्या सोडवण्यास सुरूवात केली. यानंतर काल 23 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणमध्ये येऊन उद्योजकांसोबत संवाद साधला. यानंतर चाकण बाहेर उद्योग नेण्याबाबत त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored