Chakan MIDC PMPML Bus : चाकणकरांसाठी एक खुशखबर आहे. चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गासाठी आता पीएमपीएमएल ने बससेवा सुरू केली आहे. बससेवा सुरू झाल्याबद्दल येथील नागरिक खुश आहेत . मात्र अजून अधिकृत बसथांबे बसवण्यात आले नसल्याने, सध्या प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. बस नेमकी कुठे थांबणार याची स्पष्ट व्यवस्था नसल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चाकण : 15-07-2026
चाकण एमआयडीसी औद्यागिक वसाहतीच्या (Chakan MIDC PMPML Bus) फेज-2 परिसरातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधेमुले दररोज गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत असल्याने आर्थिक बार वाढत होता, तर अनेकांना वेळेवर कामावर व शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण होत होते.
मात्र, आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने चाकण एमआयडीसी फेज-2 साठी नवीन सार्वजनिक बससेवा सुरू करून मोठा दिलासा दिला आहे. औद्योगिक परिसरातील कंपन्या, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून सार्वजनिक वाहतुकीची मागणी सातत्याने केली जात होती.
सहा बस उपलब्ध (Chakan MIDC PMPML Bus)
या मागणीची दखल घेत पीएमपीएमएलने बसची मर्यादित उपलब्धता असतानाही चाकण परिसरासाठी विशेषतः सहा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. ही बससेवा चाकण- आंबेठाण या मार्गावर धावणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध कऱण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागिकांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे.
या बससेवेमुळे खासगी वाहनांवरते अवलंबून राहणे कमी होऊ शकते. त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि इंधन खर्चातही काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कंपन्यामधील कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती वाढून औद्योगिक कार्यक्षमतेलाही चालना मिळणार आहे.
बससेवेच्या उद्धाटनाप्रसंगी पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, पिंपरी-चिंचवड डेपो व्यवस्थापक शैलेंद्र नाईक, शिंदे गावच्या सरपंच संगीता केंदळे. संचालक विनोद जैन, ओईएन कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक हरी राव, ट्रेंड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापक बसवराज पाटील, निगडीचे एडीएम मच्छिंद्र तिटकरे, स्वारगेट नियोजन विभागाचे नवनाथ बधे, तसेच देवकर, पानमंद आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा (Chakan MIDC PMPML Bus)
यावेळी विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव म्हणाले की, ही बससेवा दिर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी औद्योगिक कंपन्या, कर्मचारी आणि नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच संगीता केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्थानिकांच्या मते, बसथांबे निश्चित झाल्यास प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, बससेवा अधिक शिस्तबद्ध होईल आणि या नविन सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना प्रभावीपणे मिळू शकेल.
बसथांबे उभारण्याती नागरिकांची मागणी (Chakan MIDC PMPML Bus)
बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या मार्गावर अद्याप अधिकृत बसथांबे नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बस नेमकी कुठे थांबणार याची स्पप्ष व्यवस्था नसल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरू केली त्याचप्रमाणे नियोजित ठिकाणी तातडीने बसथांबे उभारून त्याठिकाणी फलक, वेळापत्रक आणि प्रवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
This post was last modified on July 15, 2026 8:48 pm