Translate :

Sponsored

Amravati Child Care Fire, Shocking News, 2026 : अमरावतीत नवजात बालकांचा दुर्देवी अंत, व्हेंटिलेटरचा स्फोट, बाळांच्या कक्षात लागली आग : Amravati Hospital Fire, 3 New Borns Died After Fire

अमरावतीत नवजात बालकांचा दुर्देवी अंत, व्हेंटिलेटरचा स्फोट, बाळांच्या कक्षात लागली आग.

Amravati Child Care Fire : राज्यातील अमरावती जिल्हा महिला रूग्णालयाच्या NICU मध्ये पहाटे भीषण आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना घडली कशी घडली ?

अमरावती : 24-08-2026

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून ( Amravati Child Care Fire) एक भयंकर घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा महिला रूग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागेलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पहाटे 3:30 वाजता नवजात शिशू अतिदक्षता विभागात अचनाक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली, ज्यात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. रूग्णालयात सर्वत्र भितीची वातावरण आहे. यावेळी सर्वजण येथील रूग्णांना आणि बालकांना वाचवण्यासाठी धावपळ करत होते. काही बालकांचा जीव वाचवण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळाले असले, तरी तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

रूग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट ( Amravati Child Care Fire)

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. महिला जिल्हा रूग्णालयात, तिथे 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. तिथे एका मोठ्या स्फोटामुले व्हेंटिलेटरला आग लागली. डॉक्टर आणि परिचारिकांनी तात्काळ सर्व बाळांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

या सर्व प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. अनेक बालकांना वाचवण्यात रूग्णालयांना यश आले आहे. परंतु, तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. येथील उरलेल्या बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे, तर सहा नवजात बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत वैद्याकीय उपकरणे आणि इतर साहित्या जळून खाक झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने रूग्णालयाच्या इतर खोल्यांपर्यंत आग पसरली नाही.

डॉक्टरांनी काय सांगितले ? ( Amravati Child Care Fire)

या घटनेनंतर मुलांच्या उपचारांवर देखरेख कऱणारे जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ.विनोद पवार यांनी सांगितले की, काही मुलांना पीडीएमसी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सखोल तपासानंतरच आगीचे पूर्ण स्वरूप आणि तिचे कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे रुग्ण्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवनीत राणांनी केली रुग्ण्यालयाची पाहणी ( Amravati Child Care Fire)

नवनीत राणा यांनी रुग्ण्यालयाची या दरम्यान पाहणी केली असून, रुग्ण्यालयातील अग्निशमक यंत्रणेवर सवाल निर्माण केले आहेत. याशिवाय दोषींवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणीही केली आहे. फायर ऑडिट झालं होतं की नाही याची माहितीदेखील द्यावी असे यावेळी नवनीत राणा यांनी सांगितले. प्रकाश आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याशी संवाद साधला आहे, आणि या प्रकऱणाबाबत सखोल चौकशी करावी असे त्या यावेळी म्हणाल्या.

अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकरांनी दिली माहिती ( Amravati Child Care Fire)

एनआयसीयू विभागात ही दुर्घटना घडली, त्यावेळी तिथे एकूण 39 बालके दाखल होती. आगीत आणि धुरामुळे 3 बालकांचा मृत्यू झाला. उर्वरित 36 बालके सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. सुरक्षित काढलेल्या बालकांवर तातडीने उपचार सुरू असून, त्यांना शहरातील विविध रुग्णालयांत हलवण्यात आले आहे अशी माहिती अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

पंजाबराव देशमुख रूग्णालय : 11 बालके

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : 5 बालके

मुरके हॉस्पिटल : 8 बालके

होप हॉस्पिटल : 6 बालके

पारिजात हॉस्पिटल : 2 बालके

मातेसोबत ठेवण्यात आलेली बालके : 4 बालके

मातेसोबत ठेवण्यात आलेली बालके : 4 बालके

स्थलांतरित केलेल्या सर्व बालकांवर पूर्णपणे मोफत उपचार कऱण्याचे कडक निर्देश सर्व संबंधित खाजगी व सरकारी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली घटनास्थळी ( Amravati Child Care Fire)

उपकरणांचा पुरवठा कऱणाऱ्या शिलर कंपनीच्या नागपूर येथील पुरवठादारांना उपकरणांच्या तांत्रिक तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. स्प्रिंकलर/ फॉगर यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही. तसेच फायर ऑडिटची सद्यस्थिती काय आहे, याची सखोल चौकशी केली जाईल. आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, आरोग्यमंत्री आज दुपारी रूग्णालयाला भेट देणार आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored