Ajit Doval Lokmanya Tilak Award : पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वाकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी Gen-Z तरूणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा संदेश दिला. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचेही सांगितले.
पुणे : 01-08-2026
पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval Lokmanya Tilak Award) यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026′ प्रदान कऱण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, पारंपरिक पुणेरी पगडी, धनादेश आणि’गीतारहस्य’ ग्रंथांची प्रत देऊन त्यांचा गौरव कऱण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात अजित डोवाल यांनी विशेषतः Gen-Z तरूणांना स्वतंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले.
Table of Contents
‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही’ ( Ajit Doval Lokmanya Tilak Award )
अजित डोवाल म्हणाले की,” आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा काहीही कऱण्याचा अधिकार असा त्याचा अर्थ नाही. राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही मार्ग स्वीकारता कामा नये.” त्यांनी प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारताला अधिक सक्षम आणि शक्तिशाली बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक ( Ajit Doval Lokmanya Tilak Award )
डोवाल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, भारताला सध्या मजबूत नेतृत्व लाभले आहे. देश अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या सुरक्षाविषयक आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहे. भारताची वाढती प्रगती काही विरोधी शक्तींना खटकत असून अशा काळात प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहितालाच सर्वोच्च स्थान दिले पाहिजे.
लोकमान्य टिळकांच्या विचारांतून प्रेरणा द्या ( Ajit Doval Lokmanya Tilak Award )
भाषणादरम्यान अजित डोवाल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. शिक्षणाच्या काळात पुण्यातच लोकमान्य टिळकांचे विचार जवळून समजल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ब्रिटिश सत्तेच्या काळात लोक भीतीमुळे गप्प रहात असताना लोकमान्य टिळकांनी निर्भिडपणे आवाज उठवला. तुरूंगवास भोगूनही त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा मार्ग सोडला नाही.
तरूणांना राष्ट्रनिर्माणाचे आवाहन ( Ajit Doval Lokmanya Tilak Award )
अजित डोवाल यांनी देशातील तरूणांना लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श समोर ठेवून भारताच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रत्येक युवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.