Translate :

Sponsored

Brij Bhushan Case, Big News, 2026 : महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष, दिल्ली न्यायालयाचा निर्णय : Brij Bhushan Sharan Singh Acquitted In Women Wrestlers Sexual Harrassment Case Delhi Court

महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष, दिल्ली न्यायालयाचा निर्णय.

Brij Bhushan Case : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकऱणात दिल्लीतील राऊज ॲव्हॅन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांच्या राजकीय पुनरागममनाय्चाय चर्चांना वेग आला आहे.

दिल्ली : 03-08-2026

महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील माजी खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Case) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (3 ऑगस्ट 2026 ) या प्रकरणाचा निकाल देताना बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली.

ब्रिजमोहन सिंह म्हणाले  (Brij Bhushan Case)

निकालापूर्वी बृजभूषण शरण सिंह न्यायालयात हजर झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी फक्त न्यायालय काय सांगेल तेच ऐकेन. माझ्या हातात काहीही नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना आरोपांतून मुक्त केले. हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले होते.

महिला कुस्तीपटूंना बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना कैसरजंग मतदारसंघातून उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या जागी पक्षाने त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक पातळीवरील प्रभाव कायम असल्याचे सिद्ध करत करण भूषण सिंह यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता.

न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ते पुन्हा सक्रिय राजकरणात उतरतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सुमारे 1,133 दिवसांत 127 सुनावण्या पार पडल्या होत्या आणि 20 जुलै 2023 पासून बृजभूषण शरण सिंह जामिनावर होते.

न्यायालयिन प्रक्रिया पूर्ण  ( Brij Bhushan Case )

आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या बहुचर्चित प्रकऱणाच्या न्यायालयीन प्रक्रियेचा टप्पा पूर्ण झाला आहे. मे 2024 मध्ये, न्यायलयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हेगारी धमकीचे आरोप निश्चित कऱण्याचे आदेश दिले,. तथापि, सहा तक्रारदारांपैकी एक असलेल्या महिला कुस्तीपटूने दाखल केलेल्या तक्रारीतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयाने सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव, विनोद तोमर यांच्यावरही आरोप निश्चित कऱण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली पोलिसांनी अनेक कलमे लावली होती  (Brij Bhushan Case)

15 जून रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या स्रीचा विनयभंग, लैंगिक छळ, पाठलाग करणे आणि गुन्हेगारी धमकी या कलमांखाली आरोप ठेवले आहेत. दोन्ही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored