About Us
“हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला” असे संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. या ओळींचा अर्थ असा की, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि या संपूर्ण विश्वाला मी घरासारखे समजतो. सर्व विश्व माझे कुटुंब आहे. ‘मिसलेनियस भारत’ चा पर्यटना विषयीचा आमचा विचार ही असाच आहे. याच भावनेतून आम्ही जगभरातील पर्यटन, तेथील वैशिष्ट्य, जीवनमान यांचा पर्यटनाच्या माध्यमातून अभ्यास करून, तेथिल छायाचित्र घेऊन ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःचा वेगळा इतिहास असतो, त्यानुसार तेथिल वारसास्थळं, जीवनमान आज वर्तमानात आपल्याला पहायला मिळतात. आज तो देश कसा आहे, पुर्वी त्यांचा इतिहास काय होता, तेथिल वारसास्थळांची वैशिष्ट्ये, विविध वारसास्थळांच्या निर्मितीच्या, त्यांच्या निर्माणकर्त्यांच्या कथा असा सगळा माहितीचा स्रोत घेऊन आम्ही मिसलेनियस भारतचा हा पर्यटनाचा प्रवास करत असतो. खरं तर हे जग फार विस्तीर्ण आणि विशाल आहे. सर्व देश विविधतेने नटलेले आहेत. प्रत्येक देशात, तेथिल शहरांत, ग्रामीण भागांत काहीना काहीतरी ऐतिहासिक वारसास्थळांचा ठेवा असतोच. प्रत्येक देशाची पौराणिक धार्मिक स्थळं, संग्रहालयं, उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं हीच त्या त्या देशातील शहरांची ओळख असतात. आज जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात धुसर होत आहे, मात्र त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व मोठे असते. अशाच परिचित, अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडत आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून. या ब्लॉगमध्ये संपूर्ण जगभरातील पर्यटन आणि जीवनमानाची माहिती असणार आहे. हा प्रवास माझ्यासारख्या एका भारतीय प्रवाशाच्या लेखणीतून आणि कॅमेरातून उलगडलेला आहे. मिसलेनियस भारतच्या या जागतिक प्रवासातून वाचकांना कायम नवनविन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मिसलेनियस भारतचा हा माहितीरूपी खजिना तुम्हाला नक्कीच आनंद देत राहिल.
Popular Posts:
Pune Metro Extension , Big News, 2026 : पुणे मेट्रोच्या विस्तारिकरणाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन, मात्र खराडी आणि खडकवासला मार्गाचे काम सुरू होण्यास 6 महिन्यांची प्रतिक्षा : Pune Metro Extension Delay PMC Mahametro Dispute Tender Extension
Pune Metro Extension: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या आणखी चार विस्तारित मार्गांचे भूमिपूजन होत आहे. मात्र असे असले
Pune Metro Line 3, Good News, 2026 : पुणेकर करणार हुश्श ! अखेर 3 नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन : Pune Metro Line 3 Inaugaration Date And Timings pp
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे ! शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान धावणाऱ्या मेट्रो लाईन 3 चे उद्धाटन
Pune MLC Election Result Update, Big News, 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; कॉंग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव : Pune Teachers MLC Election Results 2026 kaustubh Gawade Wins Jayant Asgaonkar Defeated
Pune MLC Election Result Update : पुणे पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आता हळूहळू जाहीर होत आहेत. पहिल्या फेऱ्यांनंतर दत्तात्रय