“हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण पै जाहला” असे संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. या ओळींचा अर्थ असा की, संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि या संपूर्ण विश्वाला मी घरासारखे समजतो. सर्व विश्व माझे कुटुंब आहे. ‘मिसलेनियस भारत’ चा पर्यटना विषयीचा आमचा विचार ही असाच आहे. याच भावनेतून आम्ही जगभरातील पर्यटन, तेथील वैशिष्ट्य, जीवनमान यांचा पर्यटनाच्या माध्यमातून अभ्यास करून, तेथिल छायाचित्र घेऊन ते आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती असते, स्वतःचा वेगळा इतिहास असतो, त्यानुसार तेथिल वारसास्थळं, जीवनमान आज वर्तमानात आपल्याला पहायला मिळतात. आज तो देश कसा आहे, पुर्वी त्यांचा इतिहास काय होता, तेथिल वारसास्थळांची वैशिष्ट्ये, विविध वारसास्थळांच्या निर्मितीच्या, त्यांच्या निर्माणकर्त्यांच्या कथा असा सगळा माहितीचा स्रोत घेऊन आम्ही मिसलेनियस भारतचा हा पर्यटनाचा प्रवास करत असतो. खरं तर हे जग फार विस्तीर्ण आणि विशाल आहे. सर्व देश विविधतेने नटलेले आहेत. प्रत्येक देशात, तेथिल शहरांत, ग्रामीण भागांत काहीना काहीतरी ऐतिहासिक वारसास्थळांचा ठेवा असतोच. प्रत्येक देशाची पौराणिक धार्मिक स्थळं, संग्रहालयं, उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळं असतात. ही पर्यटन स्थळं हीच त्या त्या देशातील शहरांची ओळख असतात. आज जगभरात अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत, ज्यांचे अस्तित्व काळाच्या ओघात धुसर होत आहे, मात्र त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व मोठे असते. अशाच परिचित, अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडत आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून. या ब्लॉगमध्ये संपूर्ण जगभरातील पर्यटन आणि जीवनमानाची माहिती असणार आहे. हा प्रवास माझ्यासारख्या एका भारतीय प्रवाशाच्या लेखणीतून आणि कॅमेरातून उलगडलेला आहे. मिसलेनियस भारतच्या या जागतिक प्रवासातून वाचकांना कायम नवनविन माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मिसलेनियस भारतचा हा माहितीरूपी खजिना तुम्हाला नक्कीच आनंद देत राहिल.

World Theatre Day – (Started – 27 March 1962 )
जागतिक रंगभूमी दिन – (२७ मार्च १९६२) जगात जेव्हा चलचित्रांद्वारे मनोरंजनाच्या माध्यमाचा म्हणजे चित्रपटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा जगभर माणसं