Translate :

Sponsored

Vinod Kambali Health Update, 2026 : विनोद कांबळीच्या तब्येतीविषयी दिली मित्रांनी माहिती, जाणून घ्या काय म्हणाले माजी क्रिकेटरविषयी : Brian Clot And Memory Loss Concerns Amid Friends Support

विनोद कांबळीच्या तब्येतीविषयी दिली मित्रांनी माहिती, जाणून घ्या काय म्हणाले माजी क्रिकेटरविषयी

Vinod Kambali Health Update : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आरोग्याबाबत सतत काहीना काही माहिती समोर येत आहे. मेंदूतील रक्तगाठ आणि स्मरणशक्तीवर झालेल्या परिणामामुळे त्यांच्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचे मित्र जसे की सचिन तेंडूलकरसह इतर अनेकजण त्यांना आधार आणि मदत करत आहेत.

मुंबई : 16-04-2026

भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambali Health Update) हा गेल्या काही वर्षापासून त्याच्या तब्येतीच्या तक्रारींमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे काही काळापूर्वी तो रूग्णालयात दाखल झाला होता. आता विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आल्याने त्याच्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यांच्या जवळच्या मित्रांच्या सांगण्यानुसार, त्यांची प्रकृती आता स्थिर असून घाबरण्यासारखं काहीही नाहीये, गेल्या काही काळात त्याच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत. पण सध्या त्याच्या प्रकृतीमध्ये हळहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे काळजीत पडलेल्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान कांबळीच्या मित्रांनी देखील त्यांच्या मदतीसाठी धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कांबळीचा जवळचा मित्र मार्क्स क्योटो याने त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. ” सुमारे वर्षभरापूर्वी कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती, ज्यावर उपचार कऱण्यात आले. मात्र असे असले तरी ही गाळ पूर्णपणे काढता येत नाही.ज्यामुळे भविष्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे. सध्या विनोद कांबळी चालू-फिरू शकतो, पण त्याची स्मरणशक्ती पूर्वीसारखी तल्लख नाही, कुमकुवत झाली आहे, तो अनेक गोष्टी विसरत आहे”. असे त्याने नमूद केले आहे.

दारू तर सुटली पण सिगरेट कायम (Vinod Kambali Health Update)

एकेकाळी विनोद कांबळी खुप दारू प्यायचा. पण आता त्याने ते व्यसन करणं थांबवले आहे. मात्र त्याने स्मोकिंग करणे बंद केले नाही. हे त्याच्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे. जर त्याने धूम्रपान करणं सोडलं नाही तर पुढे जाऊन ते खुप महागात पडू शकतं असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मित्रांनी तयार केलाय ग्रुप, आर्थिक मदतीसाठी सर्वांचा पुढाकार (Vinod Kambali Health Update)

विनोद कांबळीच्या अनेक मित्रांनी त्यांच्या मदतीसाठी व्हॉटसॲप ग्रुप बनवला आहे. ज्याद्वारे वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि विनोद कांबळीचा मित्र सचिन तेंडुलकर तसेच माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिल देव हे देखील यापूर्वी विनोद कांबळीच्या मदतीसाठी पुढे आले होते.

गेल्यावर्षी विनोद कांबळीने घेतले होते उपचार (Vinod Kambali Health Update)

गेल्या वर्षी, विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना ठाण्यातील एका खाजगी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. लघवीचा संसर्ग आणि स्नायूदुखीचा त्रास त्याला झाला होता. तपासण्या केल्यावर त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे निदान झाले. त्या रूग्णालयात विनोद कांबळींवर सुमारे दोन आठवडे उपचार कऱण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि डिस्चार्ज देण्यात आला. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, कांबळीने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि लोकांना दारू व अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केलं, कारण या वाईट सवयी आयुष्य उद्धवस्त करतात.

विनोद कांबळी यांचे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील करियर (Vinod Kambali Health Update)

विनोद कांबली 1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. तो सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आोहे. अजूनपर्यंत हा विक्रम कोणीही मोडलेला नाही. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून भारतासाठी 104 एकदिवसीय आणि 17 कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवल्यानंतर कांबळी ने मनोरंजन क्षेत्रातही आपले नशीब आजमावले आहे. 2002 मध्ये संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत ‘अनार्थ’ या चित्रपटातून विनोद कांबळीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2009 मध्ये, तो अजय जडेजा आणि माही गिल यांसारख्या कलाकारांसह ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात झळकला. त्याने एका कन्नड चित्रपटातही काम केले आहे. तो अनेक टिव्ही मालिकांमध्येही झळकला आहे. 2003 मध्ये त्याने बिग बॉस हिंदीच्या तिसऱ्या पर्वात सहभाग नोंदवला.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored