Heat Wave Warning In Maharashtra : राज्यातील उष्णता वाढत आहे. यादरम्यान आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास अत्यंत धोक्याचे असणार आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मुंबई : 16-04-2026
राज्यातील हवामानात (Heat Wave Warning In Maharashtra) मागील काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच कधी पाऊस तर उष्णता अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच गंभीर इशारा दिला आहे. राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शक्यतो उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. मुंबईसोबतच राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट असणार आहे. 18 आणि 19 तारखेला पावसाठी शक्यताही वर्तवण्यात आली. उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान वभागाने केले यासोबतच शक्यतो फार महत्त्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळणे अधिक फायदेशीर ठरेल.
भारतीय हवामान खात्याची माहिती (Heat Wave Warning In Maharashtra)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या उन्हात बाहेर पडले तर उष्माघाताची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
मुंबईसह कोकण किनानपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने आवाहन केले जात आहे. आरोग्य तज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
काय काळजी घ्यावी ? (Heat Wave Warning In Maharashtra)
भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे, थेट उन्हात जाणे टाळणे अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करत काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्णता वाढल्याने वर्धा जिल्ह्यात आजा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काही तास उष्णता वाढू शकते, त्यामुळे हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.