Translate :

Sponsored

Vinesh Phogat, Big News, 2026 : दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का ! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही : Vinesh Phogat Setback Delhi High Court Denies Interim Relief To participate in World Championship Trials

दिल्ली हायकोर्टाचा Vinesh Phogat ला मोठा धक्का ! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रायल देता येणार नाही .

Vinesh Phogat : दिल्ली उच्च न्यायालयाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या निवड चाचण्यांमध्ये विनेश फोगाटला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. या चाचण्या 14 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहेत.

दिल्ली : 11-09-2026

प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) मोठा धक्का मिळाला आहे. 14 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये विनेश फोगाट सहभागी होऊ शकणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने तिला चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अंतरिम दिलासा नकार दिला आहे. गुरूवारी रात्री, न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांनी विनेशची अंतरिम दिलासा मागणारी याचिका फेटाळून लावली.

आपल्या आदेशात, न्यायालयात स्पष्ट केले की, 7 सप्टेंबर 2026 च्या परिपत्रकात नमूद केलेले निकष सर्वांना समान रितीने लागू होतील. जर एखादा खेळाडू नियोजित स्पर्धेत सहभागी झाला नाही, तर तो भारतीय कुस्ती महासंघाने ठरवलेल्या पात्रता श्रेणींमध्ये येत नाही. यामुळे विनेशच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

विनेश फोगाटने नवीन निवड नियमांना आव्हान दिले होते. (Vinesh Phogat)

7 सप्टेंबर 2026 च्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये एक परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. नियमांनुसार, निर्धारित स्पर्धांमध्ये पदके जिंकलेले, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि 2026 च्या U20 विश्वचॅम्पियनशिपसाठी निवड झालेले खेळाडू पात्र आहेत. विनेशने चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. गर्भधारणा, प्रसुती आणि प्रसुतीनंतरच्या आरोग्यात सुधारणा होत असल्यामुळे आपण काही स्पर्धांमध्ये अनुपस्थित होते, असा युक्तिवाद तिने केला आहे. WFI ने तिला अपात्र ठरवणारी दाखवा नोटीस बजावल्यानंतर तिला गोंडा येथील सिनियर ओपन रॅंकिंग स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले, असेही तिने सांगितले.

निवदेनात नेमकं काय ? (Vinesh Phogat)

दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे ,” देशाच्या प्रतिनिधींची निवड निष्पक्ष, एकसमान आणि कामगिरिवर आधारित प्रक्रियेद्वारे केली जाईल, हे सुनिश्चित करणे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.’

न्यायालयाने हेही नमूद केले की, यापूर्वी मे महिन्यात उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने फोगाटला  (Vinesh Phogat) आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवनगी दिली होती. त्या चाचण्यांदरम्यान झालेल्या कथित गैरवर्तनाबाबतची कारणे दाखवा नोटीस अद्याप प्रलंबित आहे. बार अँड बेंचने न्यायमूर्ती शर्मा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ” डब्ल्यूएफआयचे नवीन पात्रता निकष सर्व खेळाडूंना समान  रीतीने लागू होतात आणि ते विशेषतः फोगाटला लक्ष्य करून तयार केलेले नव्हते.’ आता यानंतर विनेश फोगाटने पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored