Translate :

Sponsored

Disha Salian Case Update, Shocking News, 2026 : दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR दाखल, आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी : Disha Salian Case Fir Register By CBI

दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR दाखल, आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी

Disha Salian Case Update : दिशा सालियानाचा मर्डर झाला कि ती आत्महत्या होती ? याचे उत्तर गेली काही वर्ष सर्वांनाचा पडलेला आहे. आता या केसमध्ये दिशाच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी कऱण्याची मागणी आणि सीबीयाद्वारे तपास करण्याची मागणी केली होती.

मुंबई : 15-09-2026

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian Case Update) हिच्या मृत्यूच्या दिवसापासूनच अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. आता या केसमध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिशाच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी कऱण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल कऱण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने याप्रकरणी एफआयआर दाखल केलाय. तसेच, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्वव ठाकरे, आदित्या ठाकरे यांच्या चौकशीची सीबीआय मागणी करणार आहेत. याव्यतिरिक्त दिने मारिया, रिया चक्रवर्तीच्या चौकशीचीही सीबीआय मागणी करणार आहेत. दरम्यान, CBI कडून एफआयआरची कॉपी हायकोर्टाला दिली जाणार आहे.

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टाने दिलासा देत, याप्रकरणी एफआयआर दाखल कऱण्याचे आदेश, सीबीआयला दिलेले. आता या प्रकरणी तीन पानांचा एफआयआर आणि सात पानांचा जबाब सादर करण्यात आला आहे.

दिशा सालियानाच्या मृत्यूचा घटनाक्रम (Disha Salian Case Update)

8 जून 2020 

दिशाचा मुंबईतल्या मालाडमध्ये इमारतीवरून पडून मृत्यू

14 जून 2020 

सहा दिवसांनी अभिनेता सुशांतसिंग राजपुतचा मृत्यू

16 जून 2020

दिशाच्या मृत्यूचे राजकारण, सनसनाटीपणा नको असं कुटुंबियांकडून आवाहन

22 डिसेंबर 2023

 आमदार नितेश राणे यांच्याक़डून आदित्य ठाकरे, दिनो मारियावर आरोप, सरकारकडून एसआयटीची स्थापना

जुलै 2025 

‘दिशाने आत्महत्या केली, लैंगिक अत्याचार झाले नाहीत’ असे पोलिसांचे कोर्टात प्रतिज्ञापत्रक

20 मार्च 2025

दिशाची बलात्कार करून हत्या झाली, सीबीआय चौकशी करा अशी सतीश सालियन यांची हायकोर्टात मागणी

2 सप्टेंबर 2026 

नव्यानं एफआयआर दाखल करून चौकशी करा असे सीबीआयला हायकोर्टाचे आदेश

14 सप्टेंबर 2026

वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून सीबीआयकडून एफआय दाखल

काय आहे हे प्रकरण ? (Disha Salian Case Update)

गेली पाच वर्ष महाराष्ट्रात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूएव्हढेच गाजणारे प्रकरण म्हणजे दिशा सालियान प्रकरण. दिशा सालियान ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरूण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते. दरम्यान दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमार्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख कऱण्यात आला आहे.

दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद केले गेले. दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते,  असे देखील नमूद केले होते. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या प्रकणावरून 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored