Translate :

Sponsored

UPSC Recruitment 2026, Good News : नोकरीची सुवर्णसंधी ! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू : UPSC Recruitment 2026 Online Application Form Ora Portal

नोकरीची सुवर्णसंधी ! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू.

UPSC Recruitment 2026 : आता तरूणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय मंत्रालयांमध्ये थेट अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी ! यूपीएसएसीने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये कोणकोणती पदे समाविष्ट आहेत आणि ओआरए (ORA) पोर्टलवर अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर.

दिल्ली : 28-06-2026 

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये वेगवेगळ्या पदांवर थेट भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 जून 2026 पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 17 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

युपीएससीने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, या मोहिमेद्वारे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अुनभव असणारे उमेदवार आपल्या पात्रतेनुसार संबंधित पदांसाठी अर्ज करू शकतात.

कोणत्या पदांसाठी असणार भरती ? UPSC Recruitment 2026

1 कृषी आणि शेतकरी कल्याणा विभाग : जॉईंट डायरेक्टर

2 आयुष मंत्रालय : मेडिकल ऑफिसर/ रिसर्च ऑफिसर

3 नागरी विमानन महासंचालनालय (DGCA) : एरोनॉटिकल ऑफिसर आणि लिगल ऑफिसर

4 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय : कंपनी प्रॉसिक्युटर

5 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) डेप्युटी सुपरिंटेंडींग आर्कियोलॉजिस्ट

6 संरक्षण मंत्रालय : सिनियर फोटोग्राफिक ऑफिसर आणि फोटोग्राफिक ऑफिसर

याशिवाय सिविलियन असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, स्टोअर ऑफिसर आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात स्पेशालिस्ट ग्रेड – III व असिस्टंट प्रोफेसर यांसह अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवाराने युपीएसईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज कसा कराल ? UPSC Recruitment 2026

1. उमेदवारांनी सर्वप्रथम युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन (ORA) पोर्टलला भेट द्यावी.

2. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर आधी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

3. यानंतर अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

4. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्या आणि भविष्यातील संदर्भातील अर्जाची प्रिंट किंवा ‘कन्फर्मेशन पेज’ सुरक्षित डाऊनलोड करून ठेवा.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored