Translate :

Sponsored

UPSC Recruitment 2026, Good News : संघ लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण विभागात मोठी संधी, जाणून घ्या कोणत्या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू : Upsc Recruitment 2026 Apply Online

संघ लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण विभागात मोठी संधी, जाणून घ्या कोणत्या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू .

UPSC Recruitment 2026 : संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) शिक्षण विभागात प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल पदांच्या 828 जागांवर भरती जाहीर केला आहे. ऑनलाईन अर्ज 25 जुलै सुरू होत आहेत.

दिल्ली  : 22-07-2026

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2026) शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यूपीएससीतर्फे प्राचार्य आणि उपप्राचार्य या पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर कऱण्यात आली आहे.सरकारी शाळांमध्ये प्राचार्य किंवा उपप्राचार्य बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी तयारी कऱणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होणार असून पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल.

युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर 25 जुलै 2026 पासून प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल पदांसाठी ऑनलाईन अर्जाचा फॉर्म उपलब्ध होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज कऱण्याची संधी मिळू शकते. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 828 पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये प्रिन्सिपलपदासाठी 124 पदे आणि व्हाईस प्रिन्सिपलपदासाठी 704 पदे निश्चित करण्यात आली आहेत.

कोण पात्र ठरू शकते या पदांसाठी ? (UPSC Recruitment 2026)

प्रिन्सिपल (प्राचार्य) पद : जनरल आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे, OBC प्रवर्गासाठी 53 वर्षे आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे निश्चित कऱण्यात आली आहे.

व्हाईस प्रिन्सिपल (उपप्राचार्य) पद : जनरल आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे, OBC प्रवर्गातील 38 वर्षे आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे.

अर्ज कसा करावा ? (UPSC Recruitment 2026)

  • 1 युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला upsc.gov.in भेट द्या.
  • 2 मुख्य पानावर आधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • 3 यानंतर भरतीशी संबंधित सक्रिय लिंकवर क्लिक करा.
  • 4 अर्जात मागितलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरावी.
  • 5 सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती सबमिट करा.
  • 6 शेवटी अर्ज शुल्क भरून अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored