Ujjain Stampede : उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेडिंग परिसरात अचानक गर्दीचा दबाव वाढला. याचदरम्यान करंट पसरल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
उज्जैन्न : 17-08-2026
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी उजैनच्या महाकालेश्वर मंदिरात (Ujjain Stampede) भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भगवान महाकालांच्या दर्शनासोबतच वर्षातून केवळ एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले. नागपंचमी, श्रावण सोमवार आणि भगवान महाकालांची सवारी एकाच दिवशी आल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली.
Table of Contents
हरसिद्धी मंदिराजवळ गर्दीचा दबाव वाढला (Ujjain Stampede)
नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रांग हरसिद्धी मंदिराच्या दिशेने होती. याच परिसरातील बॅरिकेडींगमध्ये अचानक गर्दीचा दबाव वाढल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. गर्दीमध्ये काही भाविक खाली पडल्याची आणि काहींची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. मौकेवर उपस्थित सुरक्षारक्षक आणि भाविकांच्या नातेवाईकांनी पडलेल्या नागरिकांना गर्दीतून बाहेर काढले. त्यानंतर काही जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. स्थानिक माहितीनुसार, 13 भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
करंट पसरल्याच्या अफवेने घबराट (Ujjain Stampede)
या घटनेमागे करंट पसरल्याती अफवा असल्याचेही समोर आले. हरसिद्धी मंदिर चौराह्याजवळील बॅरिकेडिंग परिसरात डीपीजवळ करंट पसरल्याची माहिती गर्दीत पसरली. त्यामुळे भाविकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात काही भाविक पडल्याची तसेच बॅरिकेडिंगला धडक बसल्याती माहिती समोर आली आहे. नीलकंठ द्वाराजवळ काही भाविक बॅरिकेडींग ओलांडतानाही दिसल्याते सांगण्यात आले.
मंदिर समितीने चेंगराचेंगरीच्या बातम्या फेटाळल्या. (Ujjain Stampede)
दरम्यान, महाकाल मंदिर प्रबंध समितीने मंदिर परिसरात चेंगराचेंगरी किंवा प्रमाणात अव्यवस्था निर्माण झाल्याच्या बातम्या भ्रामक असल्याचे म्हटले आहे. नागपंचमी, श्रावण समोवरा आणि भगवान श्री महाकालेश्वरांची सवारी एकाच दिवशी असल्याने भाविकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली होती. मात्र, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या व्यवस्था कऱण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे. समितीने भाविकांना अफवा आणि अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, मंदिर प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे सांगितले आहे.
लाखो भाविकांनी घेतले दर्शन (Ujjain Stampede)
श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाकाल मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी कायम होती. उपलब्ध माहितीनुसार, लाखो भाविकांनी भगवान महाकाल आणि नागचंद्रेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. नागचंद्रेंश्वर मंदिराचे दरवाजे वर्षातून केवळ एकदाच उघडत असल्याने या दिवशी येथे दर्शनासाठी विशेष गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनासमोर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियमन आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान होते.
अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष (Ujjain Stampede)
घटनेनंतर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये मंदिर परिसरातील परिस्थितीबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय होती, याबाबत संभ्रम निर्माण झाला. मंदिर समितीने मात्र अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गर्दीच्या दबावामुळे काही भाविक जखमी झाल्याची माहिती आणि मंदिर समितीने चेंगराचेंगरीच्या दाव्याने केलेले खंडन, या दोन्ही बाबी समोर आल्याने घटनेबाबत अधिकृत माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.