Surya Kant Chief Justice : देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
नवी दिल्ली : 24/11/2025
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्या कांत (Surya Kant Chief Justice) यांनी पदभार स्वीकारला आहे. काल (23 नोव्हेंबर ) रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपला. भूषण गवई यांनी निवृत्ती घेतल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना शपथ दिली. सात देशांच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सूर्यकांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाते न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
शपथविधीसाठी कोण होते उपस्थिती (Surya Kant Chief Justice)
राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, नेते आणि माजी न्यायाधीश देखील उपस्थीत होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आणखी एका कारणाने लक्षवेधी ठरला आहे.
पहिल्यांदाच न्यायमूर्तींच्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर सात देशांचे न्यायमूर्ती उपस्थित होते. यामध्ये भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संधीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत रहातील. सुमारे 15 महिने त्यांच्याकडे हे पद असणार आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविषयी (Surya Kant Chief Justice)
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या सुरूवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्याचवर्षी त्यांनी हिसार येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर 1985 मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी चंदीगडला गेले.
LIVE: Swearing-in-Ceremony of the Chief Justice of India Shri Justice Surya Kant at Rashtrapati Bhavan https://t.co/EZGbzgCbig
— President of India (@rashtrapatibhvn) November 24, 2025
Leave a Reply