Translate :

Sponsored

Sanjay Raut On Ram Mandir, Big News,2026 : उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला दिलेली 4 किलो चांदीची वीट आणि 1 कोटी रुपये कुठे आहेत ? संजय राऊतांनी मागितला हिशोब : Sanjay Raut Claims Uddhav Thackery Silver Brick Missing Ram Mandir Trust

उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला दिलेली 4 किलो चांदीची वीट आणि 1 कोटी रुपये कुठे आहेत ? संजय राऊतांनी मागितला हिशोब.

Sanjay Raut On Ram Manidr : राम मंदिर देणगी चोरीच्या पैशातून पक्ष आणि खासदार फोडण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : 26-06-2026 

आयोध्यातील श्रीराम मंदिराला (Sanjay Raut On Ram Mandir) मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार प्रकरणी होणाऱ्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात आता शिवसेना (उबाठा) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या विटा बेपत्ता झाल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराला दिलेली चांदीची विट आणि एक कोटी रुपये कुठे आहेत ? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. राम मंदिर ट्रस्टकडून अद्याप कोणतीही पावती किंवा माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

चार किलो चांदीची वीट बेपत्ता झाल्याचा संजय राऊतांनी केला आरोप (Sanjay Raut On Ram Mandir)

राम मंदिरातील देणग्यांमधील कथित गैरव्यवहार आणि देणगी चोरी प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी कऱण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. गैरव्यवहाराचे आरोप होत असताना शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली 4 किलोची वीट देखील बेपत्ता असल्याचा आरोप केला आहे. ” राम मंदिराच्या बांधकामासाठी शिवसेनेकडून 4 किलो चांदीची वीट दान करण्यात आली होती. पण ती वीट बेपत्ता झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. उद्धव ठाकरेंनी एक कोटी आणि 4 किलो चांदीची वीट हजारो शिवसैनिक आणि संतांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी दान केली होती.” असी पोस्ट संजय राऊतांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.

ट्रस्टकडून पावती नाही (Sanjay Raut On Ram Mandir)

“राम मंदिर ट्रस्टकडून अनेक वर्षांनंतर देखील याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती अद्याप देण्यात आलेली नाही”. असा आरोप संजय राऊतांनी केला.” एक कोटी आणि चांदीची वीट गेली कुठे? या प्रकरणी सखोल तपास कऱण्याची आणि जबाबदारी निश्चित कऱण्याची वेळ आली आहे”. असे राऊतांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना देखील राऊतांनी या प्रकऱणातील मुख्य दोषी अजून ट्रस्टमध्ये काम करत आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे मंदिरातून चोरी करत आहेत. दानपेटीतून कोट्यावधी रुपये चोरी करत आहेत, असा आरोपही त्यांनी लावला आहे.

राम मंदिरातील देणगीच्या पैशातून पक्ष आणि खासदार फोडले – संजय राऊत (Sanjay Raut On Ram Mandir)

“हा चोरीचा पैसा राजकारणात येतो आणि त्याच पैशांनी खासदार आणि पक्ष विकत घेतले जात आहेत.” राम मंदिराच्या देणगीतून चोरी केलेल्या दोन हजार कोटी रुपयांचा वापर करून आप, तृणमूल आणि आता शिवसेनेचे सहा खासदार फोडले”, असा आरोप राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, या कथित गैरव्यवहार प्रकऱणी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्र्स्टच्या तक्रारीनुसार, अयोध्या येथील पोलीस ठाण्यात 8 जणांविरूद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored