Translate :

Sponsored

S.S. Rajamouli Honour, Great News, 2026 : एस. एस. राजामौलींच्या शिरपेचात मानाचा तुरा, पॅरिसमध्ये करण्यात आले सन्मानित : S.S. Rajamaoulis Receives Historic Honour In Paris

एस. एस. राजामौलींच्या शिरपेचात मानाचा तुरा, पॅरिसमध्ये करण्यात आले सन्मानित.

S.S. Rajamouli Honour : ‘बाहुबली’ आणि RRR चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांना पॅरिसमधील प्रतिष्ठित cinematheque Francaise संस्थेत कायमस्वरूपी स्थान मिळाले. भारतीय चित्रपटांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

पॅरिस : 29-06-2026 

भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक एस.एस.राजामौली (S.S. Rajamouli Honour) यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘बाहुबली’ आणि आरआरआर सारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटांद्वारे भारतीय सिनेमाला नवी ओळख मिळवून देणाऱ्या राजामौली यांचा आता फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे विशेष सन्मान कऱण्यात आला आहे.

जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संंस्थेपैकी एक असलेल्या सिनेमाथेक फ्रॉँसेझ (Cinematheque Francaise) या संस्थेत त्यांना कायमस्वरुपी स्थान देण्यात आले आहे.

महान चित्रपट अभ्यासक हेन्री लँग्लुआ यांनी स्थापना केलेली ही संस्था जागतिक चित्रपट वारशाचे जतन आणि गोरव कऱण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेत स्थान मिळणे हा केवळ एस.एस. राजामौली यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

या कार्यक्रमात ऑस्कर विजेते ग्रीक – फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा-गावरास यांनीही राजामौली यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, मास्टरक्लासपूर्वी त्यांनी जवळपास आठ तास राजामौली यांचे चित्रपट पहिले आणि संपूर्ण सत्रात उपस्थित राहून त्यांच्या दिग्दर्शनशैलीचे कौतुक केले. भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावाचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.

राजामौलींनी मानले आभार (S.S. Rajamouli Honour)

या सन्मानानंतर भावना व्यक्त करताना एस.एस. राजामौली म्हणाले. ” पॅरिसमध्ये माझ्या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले, हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. मात्र त्यानंतर मिळालेल्या या अनपेक्षित गौरवाने मी भारावून गेलो आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एका संस्थेच्या भिंतीवर कायमस्वरुपी स्थान मिळणे ही आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे”

राजामौली यांनी या सन्मानासाठी कोस्टा-गावरास आणि संपूर्ण सिनेमाथेक फ्राँसेझ परिवाराचे आभार मानत भारतीय सिनेमाला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, निर्माते हर्षा चंदुरू यांनीही हा गौरव शेअर करत लिहिले की, मार्टिन स्कॉर्सेसी, जेम्स कॅमरॉन आणि डेव्हिड फिंचर यांसारख्या जागतिक दिग्गजांनंतर एस.एस. राजामौली यांना मिळालेला हा सन्मान भारतीय सिनेमासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मते, असे सन्मान केवळ बॉक्स ऑफिसवरील यशामुळे मिळत नाहीत, तर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर कायमस्वरुपी प्रभाव टाकणाऱ्या कलाकृतींमधील मिळतात.

दरम्यान, एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी महत्त्वकांक्षी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. महेश बाबू, प्रियंका चौप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असेलल्या या बिग-बजेट चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored