Russia Nuclear Testing : डोनाल्ड ट्रम्पनंतर आता पुतिन यांनी देखील न्युक्लिअर टेस्टिंगचे आदेश सैन्याला दिले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. महायुद्धाची भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. काय आहे या दोन मोठ्या राष्ट्रांचे पुढील प्लॅन.
Russia : 06/11/2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या न्यूक्लिअर टेस्टिंगच्या आदेशानंतप आता रशियाने देखील न्यूक्लिअर टेस्टिंगसाठी तयारी सुरू केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्वादिमिर पुतिन ( Vladimir Putin) यांनी सैन्याला तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांच्या या आदेशामुळे जगभरात खळबळ माजली आहे.
बुधवारी (5 नोव्हेंबर) पुतिन यांनी लष्करप्रमुखांना अणु चाचण्या पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पुतिन यांनी ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा, याच्या एक आठवड्यापूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला न्युक्लियरप टेस्टिंगचे आदेश दिले होते. सध्या अमेरिका न्युक्लियर टेस्टिंगचे करत आहे. याच वेळी पुतिन यांच्या या आदेशाने मोठ्या संकटाची चाहूल व्यक्त केली जात आहे.
रशियन सुरक्षा परिषदेला पुतिन यांचे आदेश (Russia Nuclear Testing)
पुतिन यांनी राष्ट्रपती सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ही घोषणा जाहीर केली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने असे पाऊल उचलले तर मॉस्को देखील आपल्या अणुचाचण्या पुन्हा सुरू करेल. त्यांनी संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि काही महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांना अमेरिकेच्या अणुचाचण्यांमागचा छुपा अजेंडा जाणून त्यांच्या अणुचाचण्या सुरू करण्यास सांगितले आहे.
ट्रम्प यांचे अणुचाचण्यांचे आदेश (Russia Nuclear Testing)
डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 ऑक्टोबर 2025 रोजी अणु चाचण्या पुन्हा सुरू करत असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले की, रशिया आणि चीनच्या बरोबरीने अमेरिका देखील समान पातळीवर महत्त्वपूर्ण आणि योग्य ते पाऊल उचलले. परंतु यामध्ये अणुस्फोटकांच्या चाचण्या केल्या जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
शस्रास्रांची स्पर्धा सुरू (Russia Nuclear Testing)
अमेरिका आणि रशियाच्या अणु चाचण्यांमुळे मोठ्या शस्रास्र स्पर्धांच्या शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये चीनही उडी घेण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तान, उत्तर कोरिया देखील यामध्ये सामील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सी (IAEA) ने इशारा दिला आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेला मोठा धक्का निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या रशियाच्या आणि अमेरिकेच्या अणु चाचण्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply