Ravindra Dhangekar Pune News : पुण्यातील जैन बोर्डींगच्या जागांचे वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डींगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. याच संदर्भात आणखी एक खुलासा धंगेकरांकडून आला आहे.
पुणे : 04/11/2025
पुणे शहरातील जैन धर्मीय समाजाच्या हॉस्टेलच्या जमिनींवर गैरव्यवहारांचे प्रकरण सध्या गाजत आहे. अशा परिस्थीतीतच आणखी काही गैरव्यवहारांचे प्रकरणं उघडकीस आणण्याचे काम सध्या कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune News) यांच्याकडून सुरू आहे. मॉडेल कॉलनीतील प्रसिद्ध ‘एच.एन.डी.’ जैन बोर्डींग च्या भूखंड विक्री व्यवहारावरून आधीच खळबळ माजलेली असतानाच, आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे.औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची तब्बल 33 हजार 700 फूट जमीन विक्रीसाठी काढण्यात आली असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
सोशल मीडियावरून धंगेरकांनी दिली माहिती (Ravindra Dhangekar Pune News)
धंगेकर यांनी सोमवारी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती देत, ” पुण्यात पुन्हा एक जैन हॉस्टेल घोटाळा उघड झाला आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टने धर्मादाय आयुक्त कार्यालयात सेक्शन 36 अंतर्गत विक्रीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रस्तावामध्ये ट्रस्टच्या काही विश्वस्तांचा सहभाग असून, त्यात एच.एन. डी. जैन बोर्डींगचा विश्वस्त चकोर गांधी याचेही नाव विशेषत्वाने घेतले जात आहे.
धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, हा प्रकार एखाद्या टोळीच्या कारभारासारखा तर नाही ना ? ट्रस्टच्या भूखंड विक्रीच्या माध्यमातून काही मंडळींनी पुन्हा एकदा समाजाच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का ? त्यांनी या व्यवहारामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.
एच.एन.डी. बोर्डींगचा जुना वाद (Ravindra Dhangekar Pune News)
पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डींगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होता.मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत, याबाबत धंगेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. ” जर या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर ट्रस्टच्या भूखंड विक्रीचा धंदा पुढेही सुरूच राहील, ” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या नव्या प्रकरणामुळे जैन समाजात तसेच पुणे शहरात पुन्हा मोठी खळबळ माजली आहे. धार्मिक आणि शैक्षणिक उद्देशासाठी देणगीदारांनी उभारलेल्या ट्रस्टच्या मालमत्ता, भूखंड हे काही मोजक्या व्यक्तींच्या फायद्यासाठी विक्रीसाठी काढले जात आहे. अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. आता या प्रकरणात धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात आणि प्रशासन पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.