Pune Winter News : या वर्षी महाराष्ट्रात थंडीने दरवर्षीपेक्षा जास्त पातळी गाठली आहे. त्यामुळे नागरिक थंडी सहन करण्यासाठी शेकोटीचा पर्याय निवडतात. शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदुषण केल्यास दंडात्मक कारवाई कऱण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.
पुणे : 19/11/2025
शहरातील ( Pune Winter News ) सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदुषण केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर किंवा कचरा जाळल्यानंतर केवळ हवा प्रदुषण होते, असे नाही तर याचा परिणान थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड पीएम 10, पीएम 2.5 आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे.
हवेची गुणवत्ता राखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. त्यानुसार उघड्यावर कोळसा, जेविक पदार्थ, प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई आहे.
सध्या थंडीचे दिवस असल्याने ( Pune Winter News )
शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. यामध्ये लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळला जातो. यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे शहरातील हवा प्रदूषण वाढते.
आयुक्त नवल किशोर राम यांचा ईशारा ( Pune Winter News )
थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे वॉचमन,सफाई,कामगार, इतर कामगार, व्यक्ती, महापालिका कर्मचारी, कंत्राटी कामगार किंवा महापालिका ठेकेदारांचे कंत्राटी कामगार यांसह इतरांनी शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लास्टिक, रबर आणि इतर जाळून धूर निर्माण केल्यास किंवा शेकोटी पेटवून हवा प्रदूषण केल्यास संबंधितांवर घचकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
शहरातील किमान सेल्सिअस तापमान ( Pune Winter News )
शहरातील काही दिवसांपूर्वी 15 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलेले किमान तापमान मंगळवारी 9.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शहरातील पाषाण भागात 9 अंथ सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गारठा टिकून आहे. पुढील दोन दिवस किमान आणि कमाल तापमानमध्ये आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्र विभागाने वर्तवली आहे.
Leave a Reply