Translate :

Sponsored

Pune Water Supply Update : पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे वाढल्या अडचणी ! तीन दिवसांत तक्रारींचा पाऊस : Pune Alternate Dat Water Supply Complaints Pune Municipal Corporation Issues

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे वाढल्या अडचणी ! तीन दिवसांत तक्रारींचा पाऊस

Pune Water Supply Update : सध्या पावसाचे आगमन लांबल्यामुळे आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र पुणे महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पुणे : 19-06-2026 

यावर्षी पाऊस अजून दडी मारून बसला आहे. अशा वेळी धरण्यातील पाणीसाठा संपत आल्याने, हे पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. महापालिकेने  (Pune Water Supply Update) धरणातील उपलब्ध पाणीसाठी अधिक दिवस वापरता यावा, यासाठी शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. दिवसाआड पाणी देण्यास सुरूवात केल्यानंतर तीन दिवसांतच महापालिकेकडे 593 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या मध्यवर्ती पेठांच्या भागातून आल्या आहेत.

महापालिकेेने तीन दिवसांत आलेल्या एकूण तक्रारींपैकी 237 तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. उर्वरित भागांतील तक्रारी सोडविण्यात येत आहेत. टँकरने पाणीपुरवठा करताना अंतर कमी कऱण्यासाठी नव्याने टँकर पॉईंट सुरू कऱण्याचे नियोजन महापालिकेने केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली.

तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाणी उशिरा व कमी दाबाने येत आहे, वेळेपूर्वीच पाणी जाते, ठरवून दिलेल्या दिवशी येत नाही, अशा तक्रारींचा समावेश आहे. ‘ ज्या ठिकाणावरून या तक्रारी येत आहेत. तेथे तपासणी करून काही ठिकाणी वेळ वाढवून देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. पूर्वी टँकरच्या 1 हजार 400 फेऱ्या व्हायच्या. यामध्ये आता शंभरने भर पडली आहे, ‘ असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याबाबत कोथरूड, बाणेर, बालेवाडी परीसरातील तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. हडपसर, काळेपडळ, शांतीनगर, महंमदवाडी, सय्यदनगर, केशवनगर आणि खराडीच्या काही भागांत तक्रारी आहेत, त्या लवकरच सोडवण्यात येतील. दत्तवाडी परिसरातून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. आयुक्त नवल किशोर राम यांनी या भागात भेट देऊन पाहणी केली. तसेच. नेहमी कमी दाबाने आणि अशुद्ध पाणी पुरवठा होत असलेल्या भागातील कामे कऱण्यासाठी योजना तयार कऱण्याचे आदेश दिले.

नवीन टँकर पॉईंट सुरू करणार (Pune Water Supply Update)

उंड्री, पिसोळी परिसरात पद्मावती येथील टँकर पॉइंटवरून पाणीपुरवठा होतो. हे अंतर कमी कऱण्यासाठी उंड्री परिसरात अमेनिटी स्पेस ताब्यात घेऊन टँकर पॉईंट सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरासाठी किती पाण्याती गरज असते ? (Pune Water Supply Update)

शहराला दैनंदिन पाणीपुरवठा कऱण्यासाठी 1 हजार 600 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू होणार असून, पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठी जुलैऐवजी 31 ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना राज्य सरकारने महापालिकेने केली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी तीन टीमएसी पाणी शहरासाठी मिळणार आहे. मात्र, पाऊस उशिरा सुरू होणार असल्याबरोबरच तो कमी होणार असल्यामुळे पाणीकपात करण्यात आली आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored