Translate :

Sponsored

Pune Parvati Child Case, Shocking News, 2026 : पुण्यात 9 वर्षीय मुलीबरोबर अत्याचाराचा प्रयत्न करणारा अजोबाच ! अखेर खुलासा झाला : Pune Parvati 70 old Grandfather Arrested For Attempted assault on 9 yera Ild Granddaughter

पुण्यात 9 वर्षीय मुलीबरोबर अत्याचाराचा प्रयत्न करणारा अजोबाच ! अखेर खुलासा झाला .

Pune Parvati Child Case : पुण्यातील पर्वती परिसरात एका 70 वर्षीय आजोबाने नऊ वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजानक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतत्प नागरिकांनी परिसरात ठिय्या आंदोलन केले असून, पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याला अटक केली आहे.

पुणे : 06-05-2026 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ( Pune Parvati Child Case) असलेल्या माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या 9 वर्षीय नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव (70) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे ? (Pune Parvati Child Case)

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलीचे आई-वडील मजुरी कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी घरात एकटीच होती. तिची जबाबदारी 70 वर्षीय आजोबांवर होती. रात्री साडेनऊच्या सुमारास आजोबांनी नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा कऱण्यास सुरूवात केली.

मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. तिने प्रसंगावधान राखत घराच्या फटीतून डोकावून पाहिले. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांनी तात्काळ जमा होऊन घराचे दार उघडण्यास सांगितले. मात्र आरोपीने आतून दार बंद करून घेतले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नराधम आजोबाने मुलीला घराच्या पोटमाळ्यावर लपवले. त्यानंतर दार उघडले.

रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन (Pune Parvati Child Case)

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पर्वती पायथ्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. संतत्प नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात ठिय्या आंदोलन केले. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नीच माणसाला सोडू नका (Pune Parvati Child Case)

या घटनेनंतर पीडितेच्या आईने संतत्प प्रतिक्रिया दिली. “तो माझा सासरा असला तरी त्याने केलेले कृत्य माफीच्या पलीकडे आहे. अशा नीच माणसाला सोडू नका, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.” अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. तो 15 दिवसांपूर्वीच आमच्या घरी राहण्यासाठी आला होता. रस्ते बंद असल्याने मला आताच ही घटना समजली, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.

दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored