Translate :

Sponsored

Maharashtra Infant Mortality, Good News, 2026 : महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण घटले, आव्हान कायम, दरदिवशी होतोय 35 बालकांचा मृत्यू : Despite A Deline In The Child Mortality Rate In Maharashtra 35 Children Are

महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण घटले, मात्र दरदिवशी होतोय 35 बालकांचा मृत्यू.

Maharashtra Infant Mortality : महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याविषयी एक चांगली बातमी आहे. काळजीचे कारण अजून पूर्ण संपले नाही, मात्र महाराष्ट्रातील बाल आरोग्याची परिस्थिती सुधारत असल्याची चिन्हे आहेत. बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. ते आणखी कमी करण्यासाठी शासन काय प्रयत्न करत आहे, हे जाणून घेऊ.

मुंबई : 06-05-2026 

संपूर्ण देशासह महाराष्ट्रात ‘बालमृत्यू’  ( Maharashtra Infant Mortality ),होण्याचे प्रमाण गेल्या अनेक वर्षांपासून बरेच आहे. आरोग्या विभागासमोरील हा प्रश्न म्हणावा इतका सुटलेला नाही. बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजिनिक आरोग्य विभाग सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण घटत आहे, मात्र तरीही हे आव्हान अजून संपलेले नाही. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार2025-2026 या वर्षात राज्यात 12792 बालमृत्यू नोंदवले गेले. दररोज सरासरी 35 बालकांचा मृत्यू होतो, असे चित्र आहे. पाच वर्षांपूर्वी ही संख्या 45 इतकी नोंदवली जात होती.

आरोग्यसेवा विभागाचे संयुक्त संचालक डॉ.संदीप सांगळे म्हणाले की, “गेल्या काही वर्षात बालमृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. ती आणखी कमी कऱण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक बालमृत्यूचे परीक्षण कऱण्यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. महिला व बालकल्याण विभागासोबत समन्वय साधून महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले जाते, कारण मुलांचे आरोग्य हे मातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. लसीकरण पथकेही तळागाळात काम करून एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, याची काळजी घेत आहेत.”

काय आहेत बालमृत्यूची कारणे ? ( Maharashtra Infant Mortality )

अकाली जन्म, जन्मतः कमी वजन, जन्मावेळी श्वास न लागणे (बर्थ ॲफ्सिक्सिया), श्वसनावरील ताण, न्यूमोनिया, सेप्सिस, जन्मजात विकृती आणि आकस्मिक मृत्यू ही बालमृत्यूची प्रमुख कारणे आहेत.

बालमृत्यू थांबवण्यासाठीचे प्रयत्न ( Maharashtra Infant Mortality )

बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पाच आदिवासी भागातील जिल्ह्यांमध्ये लसीकरण कऱण्याचा निर्णय यापूर्वी सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. आदिवासी बांधवांबाबत आरोग्य योजनांबाबत माहिती दिली गेली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पाऊल उचलत आहे ही बाब निर्दशनास आणली. या सर्व परिस्थितीत शासनाला मदत केली जावी या हेतूने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

कुपोषणामुळे होतात मृत्यू ( Maharashtra Infant Mortality )

कुपोषणामुळे मेळघाट परिसरात लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. चिखलदरा आणि धरणी परिसरात काही बालकांचा यापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती दिली गेली. त्यातच आता कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कुठेतरी थांबायला हवेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored