Translate :

Sponsored

Pune Ganesh Festival, Big News, 2026 : गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त, 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत तीन भागांत असणार मद्यविक्री बंद : Pune Strict Security Arrangements By Pune Police For Ganeshotsav

गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त, 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत तीन भागांत असणार मद्यविक्री बंद

Pune Ganesh Festival : गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शहरातील पोलीस बंदोबस्त. गणेशोत्सवातील गर्दी आणि विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन पोलीस हद्दीत मद्यविक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुणे : 11-09-2026 

गणेशोत्सव (Pune Ganesh Festival)  शांततेत पार पडावा, उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने पुणे शहरातील मद्यविक्रिवर निर्बंध घातले आहेत. गणेश चतुर्थी, विसर्जन मिरवणुका आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांच मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील दारूची दुकाने, बार आणि परमिट रुमना या कालावधीत मद्यविक्री करता येणार नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी पुणे शहरात मद्यविक्री बंद राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्या मार्गांवरील संबंधित परिसरातही मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकरा घडू नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

खडक, विश्रामबाग, फरासखाना हद्दीत विशेष निर्बंध (Pune Ganesh Festival)

खडक, विश्रामबाग आणि फरासखान पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मद्यविक्री बंद राहणार आहे. या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मद्यविक्रीची दुकाने, बार तसेच परमिट रुममध्ये या काळात मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने संबंधित भागात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

मिरवणुकाच्या समाप्तीपर्यंत निर्बंध लागू (Pune Ganesh Festival)

26 सप्टेंबर रोजीही विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत संबंधित परिसरात मद्यविक्री सुरू करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार निर्बंधाचा कालावधी मिरवणुकाच्या प्रत्यक्ष समाप्तीपर्यंत लागू राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते आणि मिरवणुक मार्गांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातच विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या काळात मद्यपानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ नयेत आणि उत्सव शांततेत पार पडावा, या उद्देशाने मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

आदेशाचे पालन न केल्यास कारवाई (Pune Ganesh Festival)

प्रशासनाने संबंधित मद्यविक्री आस्थापनांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री केल्यास संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य कऱण्याचे आवाहान केले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored