Translate :

Sponsored

Pratap Sarnaik RTO News, Big News, 2026 : RTO मधील भ्रष्टाचारावर सरकारचा प्रहार, तीन अधिकाऱ्यांना सक्तीची रजा जाहीर : Maharashtra RTO Corruption Case Officers Forced leave Pratap Sarnaik

RTO मधील भ्रष्टाचारावर सरकारचा प्रहार, तीन अधिकाऱ्यांना सक्तीची रजा जाहीर

Pratap Sarnaik RTO News : महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरिक्षक योगेश मोरे आणि गणेश विघ्ने यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा केली.

मुंबई : 09-07-2026

परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  (Pratap Sarnaik RTO News) यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकऱणात संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली.

विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला मुद्दा (Pratap Sarnaik RTO News)

विधानसभेच्या कामकाजादरम्यान कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टिवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय (Pratap Sarnaik RTO News)

सरनाईक यांनी सांगितले की, आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EWO) सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीवर कोणताही परिणान होऊ नये आणि तपास निष्पक्षपणे पार पडावा, यासाठी खालील अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार
  • मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे
  • मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने
  • IPS अधिकाऱ्यांकडे तपासाची जबाबदारी

या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी सुनिश्चित करण्यासाठी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांती नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भष्ट्राचाराला कोणतीही जागा नाही ‘ (Pratap Sarnaik RTO News)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ” परिवहन विभागात भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. चौकशीवर कोणताही प्रभाव प़डू नये आणि सत्य बाहेर यावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सक्तिच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.”

जनविश्वास टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध (Pratap Sarnaik RTO News)

राज्याच्या परिवहन व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी आणि जनकेचा विश्वास कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराविरोधातील ही मोहीम केवळ या प्रकरणापुरती मर्यादित राहणार नसून, भविष्यातील अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या या निर्णयामुळे आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored