Translate :

Sponsored

PMRDA New Project , Good news,2026 : पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार, 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प : PMRDA Has Taken A Big Decision For Cleanliness In Rural And Suburbn Areas

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार, 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

PMRDA New  Project : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण आणि उपनगरीय भागातील स्वच्छतेसाठी एक मोठे पाऊल ऊचलले आहे. काय आहे हा प्रकल्प ते जाणून घ्या.

पिंपरी : 16-02-2026

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ग्रामीण आणि उपनगरीय  (PMRDA New  Project )  भागातील स्वच्छतेसाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. विविध विकास केंद्रामधील सांडपाणी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी 300 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेसह एकूण 1,209,08 कोटी रूपयांच्या भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे. पुणे महानगर हद्दीतील 27 गावांमध्ये मैला व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणार आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी, पवना आणि मुळा या नद्यांच्या प्रदुषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

पाच तालुक्यांचा समावेश  (PMRDA New  Project )

या उपक्रमांतर्गत खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये नटवर्क आणि प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदारावर केवळ बांधकामाचीच नव्हे, तर पुढील 5 वर्ष संचलन, देखरेख आणि 5 वर्षांचा दोष दायित्व कालावधी अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

तालुकानिहाय प्रकल्पाचा खर्च  (PMRDA New  Project )

  • हवेली (8 गावे) : 320 कोटी 16 लाख रुपये (सर्वाधिक खर्च)
  • मुळशी (6 गावे ) : 272 कोटी 13 लाख रुपये
  • शिरूर (4 गावे ) : 244 कोटी 23 लाख रुपये
  • खेड (7 गावे ) : 135 कोटी 10 लाख रुपये
  • मावळ (2 गावे ) : 4 कोटी 53 लाख रुपये

नदी सुधार प्रकल्पालाही वेग

‘पीएमआरडीए‘ने इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे. पवना नदी सुधारणेसाठी पुढील आठवड्यात निविदा प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • प्रदुषण मुक्ती : नद्या आणि ओढ्यांचे प्रदुषण कमी होऊन भूजल पातळीची गुणवत्ता सुधारेल.
  • वेळापत्रक : दीड महिन्याच्या निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदारांची नियुक्ती होऊन कामाला गती मिळेल.
  • आधुनिक तंत्रज्ञान :  डिझाइन, पुरवठा आणि उभारणी अशा सर्व स्तरांवर अत्याधुनिक प्रणालीचा वापर.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored