PM Narendra Modi On South Africa Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि जागतिक दक्षिणेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे जी-20 शिखर परिषदेत जोरदारपणे उपस्थित केले जाणार आहे.
नवी दिल्ली : 21/11/2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर ( PM Narendra Modi On South Africa Tour ) असणार आहे. भारत आणि जागतिक दक्षिणेशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे जी – 20 शिखर परिषदेत जोरदारपणे उपस्थित केले जाणार आहेत. मात्र, या नेत्यांच्या घोषणांमध्ये काय समाविष्ट असणार आहे हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. भारताच्या प्राधान्यक्रमांवर पूर्ण विचार केला जाईल, अशी माहिती सध्या दिली गेली आहे.
ग्लोबल साऊथमधील देशात जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. पहिल्यांदाच ही शिखर परिषद अफ्रिका खंडात होत आहे, ज्यामुळे अफ्रिका आणि विकसनशील देशांशी संबंधित मुद्यांवर जागतिक लक्ष वाढेल. 2023 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले. यावर्षी दक्षिण अफ्रिका या गटाचे अध्यक्षपद भूषवत आहे आणि 20 वी शिखर परिषद जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
पंतप्रधान मोदी 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान तेथे असतील. त्यांचे अनेक द्विपक्षीय कार्यक्रमही नियोजित आहेत. ज्यांची क्रमवारी अंतिम स्वरूपात केली जात आहे. पंतप्रधानांचा हा दक्षिण अफ्रिकेचा चौथा अधिक-त दौरा असेल. यापूर्वी, त्यांनी 2026 मध्ये द्विपक्षीय दौरा आणि 2018 आणि 2023 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भेट दिली होती.
एकता,समानता,शाश्वतता ही थीम ( PM Narendra Modi On South Africa Tour )
दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्षपद वर्ष ” एकता, समानता, शाश्वतता” या थीमवर आधारित आहे. जागतिक अजेंड्यावर विकसनशील देशांच्या गरजा समाविष्ट करण्यासाठी चार प्रमुख प्राधान्य क्षेत्रे ओळखली गेली आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि कर्ज शाश्वतता यारख्या मुद्यांवर भर दिला. वर्षभर बैठकांमध्ये या विषयांवर भर देण्यात येणार आहेत. शिखर परिषदेच्या घोषणेत त्यांचा समावेश केला जाईल अशी आशा आहे.
G-20 हा जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा समुह ( PM Narendra Modi On South Africa Tour )
G-20 हा जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे, जो जागतिक GDP व्यापार आणि लोकसंख्येचा मोठा वाटा दर्शवितो. दहशतवाद हा भारतासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु जी-20 हा प्रामुख्याने आर्थिक मुद्यांवर केंद्रीत असलेली संघटना आहे आणि सर्व चर्चा त्या दिशेने होत आहेत.
Leave a Reply