Translate :

Sponsored

PM Modi Foreign Visit, Big News,2026 : युएइ ते इटली असा असणार पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा; काय असणार महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे : Pm Modi Foreign Visit UAE to Italy Europe Mission

युएई ते इटली असा असणार पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा; काय असणार महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे ( फोटो-संग्रहित, सोशलमीडिया)

PM Modi Foreign Visit : पंतप्रधान मोदी शुक्रवारपासून 5 देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एआय तंत्रज्ञान, उर्जा संरक्षण भारत-नॉर्डिक शिखर यांसारख्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली : 12-05-2026 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Foreign Visit) शुक्रवारपासून (15 मे) पाच देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE), नेदरलँडस, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांच्या 5 दिवसीय दौऱ्यावर पंतप्रधान असतील. या दरम्यान व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. याशिवाय अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील टप्पे (PM Modi Foreign Visit)

संयुक्त अरब अमिराती : सुरुवातीला 15 मे रोजी पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) ला भेट देतील. यावेळी ते युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल न्याह्यान यांची भेट घेतील. या भेटीत उर्जा सुरक्षा आणि भारतीय समुदायाच्या हितांवर चर्चा केली जाणार आहे.

नेदरलँडस : यानंतर पंतप्रधान नेदरलँडसमध्ये किंग विलेम-अलेक्झांडर आणि नेदरलँडसचे पंतप्रधान रॉब जेटेन यांची भेट घेणार आहेतय या भेटीत सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक विषयांवर संबंध दृढ कऱण्यावर चर्चा होणार आहे. 15 ते 17 पर्यंत हा दौरा असेल.

स्वीडन : यानंतर 17 मे रोजी स्वीडनला रवाना होतील. येथे स्वीडनला गोथेनबर्ग येथे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांची पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत. या भेटीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुरवठा साखली मजबूत कऱण्यावर द्विपक्षीय चर्चा होईल. तसेच युरोपियन राऊंड टेबल फ़ॉर इंडस्ट्रीला पंतप्रधान संबोधित करतील. भारत आणि युरोपमधील व्यापार वाढवणे याचा हेतू आहे.

नॉर्वे : यानंतर 18 मे रोजी पंतप्रधान नॉर्वेला भेट देतील. या ठिकाणी ओस्लो येथे होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या परिषदेत डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड, स्वीडन, नॉर्वेचे नेतेही सहभागी होणार आहेत. या परिषदेत रिन्यूएबल एनर्जी आणि स्पेस रिसर्चवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

इटली : या दौर्याच्या शेवटट्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इटलीला भेट देतील. येथे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर पंतप्रधान मोदी चर्चा कऱणार आहेत.

दौऱ्याचा मुख्य उद्देश (PM Modi Foreign Visit)

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि वायूचा पुरवठा सुनिश्चित करणे

एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ग्रीन ट्रान्झिशनमध्ये जागतिक सहकार्य वाढवणे.

भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार कराराला गती देणे.

पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यावर युरोप आणि आखाती देशांत भारताचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored