Pimpari-Nigadi Metro work : पिंपरी-निगडी मधील रहिवाश्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील 35 टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील 14 महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूमी अधिग्रहण आणि विविध परवानग्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या.
पिंपरी : 10/11/2025
स्वारगेट ते पीएमसीएसी या मेट्रो मार्गाचा (Pimpari-Nigadi Metro Work) विस्तार असलेल्या साडेचार किलोमीटर लांबीच्या पिंपरी-निगडी मेट्रो प्रकल्पाच्या कामात आता गती आली असून सुमारे 35 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महामेट्रो प्रशासनाने ठेवले आहे. या मार्गामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक परिसराला पुण्याशी थेट मेट्रोद्वारे जोडणी मिळणार असून, प्रवासाचा वेळ तब्बल 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. या प्रकल्पाचा एकुण खर्च 910 कोटी 18 लाख रूपये इतका आहे, अशी माहिती महामेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.
या विस्तारित मार्गाची एकुण लांबी 4.51 किलोमीटर असून तो चार टप्प्यांत विभागला गेला आहे. पीएमसीएमसी ते चिंचवड (1.463 किमी), चिंचवड ते आकुर्डी (1.651 किमी), आकुर्डी ते निगडी (1.062) आणि निगडी ते भक्ती -शक्ती चौक (0.975 किमी) हा पूर्णपणे इलेव्हेटेड (उंचावर बांधलेला) मार्ग जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी उभारला जात आहे.
या विस्तारित मार्गावर चिंचवड, खंडोबा माळ चौक (आकुर्डी),टिळक चौक (निगडी) आणि भक्ती-शक्ती चौक अशी चार स्थानके बांधली जात आहेत. चिंचवड स्थानक औद्योगिक व शैक्षणिक परिसरांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे, तर भक्ती-शक्ती स्थानकामुळे देहू, तळेगाव, वडगाव व चिखलीसारख्या उपनगरांतील प्रवाशांना मेट्रोची थेट सुविधा मिळणार आहे. या स्थानकांना पीएमपी बस, रेल्वे आणि ऑटोरिक्षा सेवांशी जोडल्याने वाहतूक सुसंवाद वाढून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
परवानग्या पूर्ण, काम वेगाने सुरू (Pimpari-Nigadi Metro Work)
ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातील 35 टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील 14 महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूमी अधिग्रहण आणि विविध परवानग्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, महापालिका, एमआयडीसी आणि खासगी मालकांसोबतची चर्चा यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे.
पिलर आणि सेगमेंटसची प्रगती (Pimpari-Nigadi Metro Work)
या मार्गासाठी एकुण 151 पिलर उभारले जाणार असून, आतापर्यंत 60 हून अधिक पिलक आणि 78 फाऊंडेशन व पिलर कॅप्सचे काम पूर्ण झाले आहे. निगडी-चिंचवड विभागात कामाला प्राधान्य देण्यात आले असून, सर्व पिलर भूकंपरोधक तंत्रज्ञानाने बांधले जात आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गाची रचना अधिक मजबूत आणि सुरक्षित राहणार आहे.
दरम्यान, प्रकल्पासाठी एकुण 1337 सेगमेंटस तयार कऱण्यात येणार असून, त्यापैकी 517 सेगमेंटसचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरपासून निगडी-चिंचवड परिसरात सेगमेंट उभारणी सुरू झाली असून, प्रीकास्ट यार्डमध्ये उत्पादन वेगाने सुरू आहे. खंडोबा माळ चौकात पहिला सेगमेंट लॉंचिंग गर्डर बसवून प्रत्यक्ष उभारणीस सुरूवात झाली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, ” सध्या 35 टक्के स्थापत्यविषयक काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला गती देण्यात आली आहे.”
Leave a Reply