Translate :

Sponsored

New Rule 11th,12th Student, Big News, 2026 : 11 वी,12 वीच्या विद्यार्थ्यांना नवे नियम लागू, बायोमेट्रीक हजेरी, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगसह अनेक बंधने लागणार : New Rule For 11th 12th Student in Upcoming Year

11 वी,12 वीच्या विद्यार्थ्यांना नवे नियम लागू, बायोमेट्रीक हजेरी, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगसह अनेक बंधने लागणार.

New Rule 11th,12th Student : महाराष्ट्र शिक्षण प्रशासनाने इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता परत एकदा बंधनकारक हजेरीचा नियम लागू केला आहे. काय आहेत हे नविन नियम जाणून घेऊ.

मुंबई : 02-06-2026 

अकरावीच्या  (New Rule 11th,12th Student ) विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याआधीच राज्यातील शिक्षण प्रशासनाला जाग येऊन, विद्यार्थ्यांसाठी हजेरी बंधनकारक करण्याता नियम लागू करण्यात आला आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे, राज्यातील खाजगी क्लाससेचा झालेला सुळसुळलाट थांबवून, कॉलेजला विद्यार्थ्यांनी महत्त्व द्यावे यासाठी हा नियम लागू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी नवे नियम लागू केले आहेत.

नवीन नियम लागू होणार (New Rule 11th,12th Student)

अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे जावे लागेल आणि त्यांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रीक हजेरीचेही बंधन घालण्यात येणार आहे. वर्गात विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे.

इयत्ता अकरावी-बारावीच्या वर्गात प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयात न जाता, खासगी शाळेत हजेरी लावत होते. कोचिंग क्लासेसमध्ये जाण्याच्या या फॅडमुळे महाविद्यालयातील हजेरीवर परिणाम होत होता. काही काही शाळांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत करार केल्याच्याही तक्रारी आहेत. या सगळ्याचा विचार करून शिक्षणाधिकाऱ्यांनी नवीन नियम लागू केले आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored