Translate :

Sponsored

Neet Paper Leak Motegaonkar, Big News, 2026 : मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठी NEET पेपर फोडला का ? तपासात अनेक गोष्टी उघड : NEET Paper Leak Did Shivraj Motegaonkar Leak The Exam For His Own Son

मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठी NEET पेपर फोडला का ? तपासात अनेक गोष्टी उघड .

Neet Paper Leak Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकऱणात लातूरच्या नामांकित क्लास RCC संस्थेचा संचालक शिवराज मोटेगावकरला दिल्लीच्या विशेष न्यायलयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्ली : 17-05-2026 

सध्या देशभरात एकच विषय सुरू आहे. तो म्हणजे NEET पेपरफुटीच्या प्रकऱणाचा. या प्रकऱणात अनेक बड्या माणसांचा हात असण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. अशाच एक प्रसिद्ध नावांपैकी लातूरच्या प्रसिद्ध RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर (Neet Paper Leak Motegaonkar) याला सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गेल्या दोन दिवसांच्या कसून चौकशीत सीबीआयच्या हाती मोटेगावकरविरोधात  अत्यंत भक्कम पुरावे लागले असून, त्याने स्वतःच्या मुलासाठीच नीटचा पेपर फोडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे.

मोटेगावकरच्या घरावर छापा  (Neet Paper Leak Motegaonkar)

सीबीआयने लातूर येथे शिवराज मोटेगावकरच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तपासाला मोठे यश आले आहे. या झाडाझडतीत सीबीआयला त्याच्या घरातून चक्क ‘केमेस्ट्री’ (रसायनशास्र) विषयाची नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका हस्तगत झाली आहे.

या प्रकऱणात दोन दिवसांपूर्वी लातूरमधून अटक कऱण्यात आलेला प्रा.कुलकर्णी याचा थेट संबंध जोडला जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या परीक्षा प्रक्रियेत कुलकर्णींकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यानेच ही गोपनीय प्रश्नपत्रिका मोटेगावकरला पुरवल्याचा संशय आहे. घरातच थेट मूळ प्रश्नपत्रिका सापडल्यामुळे मोटेगावकरचा या घोटाळ्यातील थेट सहभाग आता पूर्णपणे उघड झाला आहे.

मोटेगावरने स्वतःच्या मुलासाठी केला प्लॅन (Neet Paper Leak Motegaonkar)

CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी शिवराज मोटेगावकरचा स्वतःचा मुलगा देखील 12 वीत होता आणि त्याने नीटची परीक्षा दिली होती. आपल्या मुलाल वैद्यकीय प्रवेशासाठी (MBBS) जास्तीत जास्त गुण मिळावेत आणि तो डॉक्टर व्हावा, याच एका उद्देशाने मोटेगावकराने पेपरफुटीसारखा एवढा मोठा कायदेशीर धोका पत्करल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर मोटेगावकरने याचा व्यावसायिक गैरफायदा उठवल्याता संशयही सीबीआयने व्यक्त केला आहे. आपल्याकडे आलेल्या या प्रश्नपत्रिकेच्या जोरावर त्याने लातूर आणि परिसरातील इतर श्रीमंत व गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला. ” मुलांना नीट परीक्षेत हमखास यश मिळवून देतो.” असे आमिष दाखवून त्याने अनेक पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर येत आहे.

दिल्ली न्यायालयाने 9 दिवासांची सीबीआय कोठडी सुनावल्यामुले आता सीबीआय मोटेगावरची दिल्लीत कसून चौकशी करत आहे. या 9 दिवासंच्या चौकशीच अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored