Translate :

Sponsored

NEET Re-Exam 2026, Good News, 2026 : 21 जूनला पुन्हा NEET परीक्षा होणार, NTA ने दिली माहिती : NEET Exam 2026 Admit Card Release Update Before 21 June Exam

21 जूनला पुन्हा NEET परीक्षा होणार, NTA ने दिली माहिती.

NEET Re-Exam 2026 : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने 21 जूनला होणाऱ्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. परीक्षेपूर्वी काही दिवसांत ॲडमिट कार्ड वितरीत केले जाणार आहेत.

नवी दिल्ली : 15-05-2026

भारत सरकारक़डून मंजूरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) नीट युजी 2026 (NEET Re-Exam 2026 )परीक्षेच्या पुनर्परिक्षेची तारीख जाहीर केली आहे. नीट युजी 2026 परीक्षा रविवारी, 21 जून 2026 रोजी होणार आहे. एका अधिकृत निवेदनात, एनटीएने उमेदवार आणि पालकांना परीक्षेसंबंधित अद्यतने आणि इतर माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाईटवर अवलंबून राहण्यास सांगितले आहे. संस्थेने त्यांना एनटीएच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त इतर कोणत्याही पोर्टल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.

संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर (NEET Re-Exam 2026 )

एनटीएने आपल्या अधिकृत खात्यावर @NTA_Exams द्वारे नीट युजी 2026 परीक्षेची तारीख जाहीर कऱण्यासोबतच आपला अधिकृत ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक शेअर केला आहे. विद्यार्थी neet-ug@nta.ac.in किंवा mailto:neet-ug@nta.ac.in वर एनटीएशी संपर्क साधू शकतात. तुम्ही NTA च्या हेल्पलाईन क्रमांक 011-40759000/011-69227700 वर देखील संपर्क साधू शकता. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी आता त्यांच्या NEET UG पुनर्परिक्षेच्या प्रवेशपत्राची वाट पाहतील.

जुने प्रवेशपत्र वापरता येणार नाही (NEET Re-Exam 2026 )

जेव्हा NTA ने NEET UG परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली, तेव्हा त्यांनी आधीच जाहीर केले होते की नवीन परीक्षेच्या तारखेसोबत एक नवीन प्रवेशपक्ष दिले जाणार आहे. परीक्षा केंद्र तेच राहील. 21 जून, 2026 रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना एक नवीन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल, जे NTA द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.

21 जूनच्या NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र कधी प्रसिद्ध होईल ? (NEET Re-Exam 2026 )

NEET UG पुर्नपरीक्षेची तारीख 21 जून, 2026 असेल. या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र आगाऊ डाऊनलोड करावे लागेल. एनटीए साधारणपणे परीक्षेच्या तारखेच्या 5-6 दिवस आधी प्रवेशपत्र देते. नीट युजी परीक्षा 21 जून रोजी होणार असून, नीट युजी प्रवेशपत्र 15 जून 2026 रोजी दिले जाईल. ते डाऊनलोड कऱण्यासाठी, विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत वेबसाऊट neet.nta.nic.in ला भेट द्यावी लागेल.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored