Translate :

Sponsored

Nasrapur Crime Postmortem Report, Shocking,2026 : छातीवर व्रण, तोंडात बोळा…! नसरापूर प्रकऱणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर : Nasrapur Shocking PM Report Accused Stuffed Socks Into Minors Mouth During Brutal Assault

छातीवर व्रण, तोंडात बोळा...! नसरापूर प्रकऱणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर .

Nasrapur Crime Postmortem Report: पुण्यातील शासकीय ससून रूग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर केला आहे. या अहवालातील गोष्टी समोर आल्याने, जनमानस सुन्न झाले आहेत. या अहवालामुळे जनक्षोभ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नसरापूर : 05-05-2026 

पुण्यातील नसरापूर (Nasrapur Crime Postmortem Report), येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका 65 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकऱणातील आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर होती. इतकेच नव्हे तर तो विकृत असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकऱणातील मृत मुलीचा शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल सादर झाला आहे.

माहिती अंगावर काटा आणते (Nasrapur Crime Postmortem Report)

पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवालातील माहिती अंगावर अक्षरशः काचा आणणीरी आहे. या अहवालावरून नराधम कांबळेने मुलीवर अत्याचार करून तिची किती निर्घुणपणे हत्या केली असेल, हे दिसून येते. नसरापूरमधील पिडितेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, अत्याचारावेळी आरोपीने मुलीच्या तोंडात मोडा कोंबला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना त्याने तिच्या तोंडात मोजा कोंबला होता. तिच्या छातीवर मारहाणीचे व्रणही उमटले होते. या अहवालामुळे त्याने त्या छोट्या जीवाला किती यातना दिल्या, हे समजते.

पुण्यातील शासकीय ससून रूग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर केला आहे. या अहवालातील गोष्टी समोर आल्याने आता आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. पोलीसांनी या प्रकरणी आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करत आहेत. याप्रकऱणात लवकरच आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.

नसरापूरची ही घटना काय आहे ? (Nasrapur Crime Postmortem Report)

मृत मुलगी आपल्या आई-वडिलांसह पुण्यात रहात होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. 1 मेला अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू दाखवायला नेतो, असे सांगून तिला आपल्या सोबत नेले. तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत नवले पुलावर रास्ता रोको आंदोलनही केले. या नंतर राज्य सरकारने या प्रकऱणाचा तपास आणि खटला जलगदीने न्यायालयात चालवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored