Translate :

Sponsored

Nashik TCS Nida Khan, Big News, 2026 : नाशिक TCS कंपनीच्या ‘निदा खानला’ अटक ! कुठे लपली होती निदा खान ? काय आहे प्रकरण ? : Nashik Company Moilestion Case Nida Khan Arrested From Chhatrapati Samhbaji Nagar

नाशिक TCS कंपनीची एचआर निदा खानला अटक ! कुठे लपली होती निदा खान ? काय आहे प्रकरण ?

Nashik TCS Nida Khan : नाशिक TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. कौसर पार्क परिसरात ती लपून बसली होती.

छत्रपतीसंभाजी नगर : 08-05-2026

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील (Nashik TCS Nida Khan) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, सक्तीचे धर्मांतर आणि विनयभंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अनेक दिवसांपासून फरार असलेली महिला आरोपी निदा खानला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला छत्रपती संभाजीनगरच्या कौसर पार्क परिसरातून ताब्यात घेतले, यानंतर निदा खान ज्या घरात लपली होती, त्या परिसरातील नागरिकांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

कुठे लपली होती निदा खान ? (Nashik TCS Nida Khan)

निदा खान ही छत्रपती संभाजीनगर कौसर पार्त परिसरात नाव बदलून, अत्यंत गुप्तपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सापळा रचून काल रात्री तिला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकमध्ये आणून तिच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे  एसआयटीच्या (SIT) तपासाला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.

आता निदा खान ज्या ठिकाणी रहात होती, त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निदा खान ही कौसर पार्कमधील ज्या घरात रहात होती, त्या परिसरात भाडेकरूंची संख्या जास्त आहे. तसेच या ठिकाणी राहणारे लोक एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. यामुळेच तिला या ठिकाणी राहणं सोपं गेलं.

या परिसरात नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून रिकामे होते. मूळ मालकाने ते घर विकल्यानंतर तिथे नक्की कोण रहायला आले, याची कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही अनेकदा फक्त एका वयस्कर व्यक्तीला या घरातून बाहेर ये-जा करताना पाहिले होते. तो माणूस हाता दूध किंवा किराणा सामान घेऊन येताना दिसायचा. पण घरात निदा खान लपलेली आहे, याचा आम्हाला पुसटसा अंदाजही आला नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितलं. हे लोक गेल्या 4 ते 5 दिवासंपूर्वीच या ठिकाणी रहायला आले असावेत.ते दिवसा आले की रात्री, याबद्दल कोणालाही समजले नाही, असेही स्थानिकांनी सांगितले.

काय आहे निदा खान आणि नाशिक टीसीएस प्रकऱणा ? (Nashik TCS Nida Khan)

नाशिकच्या टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे शोषण करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त् करणे, धार्मिक भावना दुखावून त्यांचा विनयभंग करणे अशा गंभीर आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे सरकारने याची चौकशी एसआयटी ( SIT) कडे सोपवली आहे. निदा खानच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, हे लवकरच समोर येईल.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored