Translate :

Sponsored

Nashik TCS Conversion Case, Shocking News, 2026 : निदा खानला नक्की आश्रय कोणाचा ? धर्मांतरणाच्या रॅकेटविषयी तपास सुरू : Who Is The MIM Corporator Who Gave Shelter To Nida Khan In The Nashik Conversion Case

निदा खानला नक्की आश्रय कोणाचा ? धर्मांतरणाच्या रॅकेटविषयी तपास सुरू .

Nashik TCS Conversion Case : सध्या नाशिकमधील टीसीएस कंपनीमधी धर्मांतरणाची केस चांगलीच गाजत आहे. यातील एक आरोपी निदा खान अनेक दिवसांपासून पसार होती. तिला अटक कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या प्रकऱणाची पाळेमुले नक्की कुठ पर्यंत आहेत. हे कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का ? याचा तपास सध्या सुरू आहे.

नाशिक : 08-05-2026

नाशिकमधील टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात ( Nashik TCS Conversion Case ) मुख्य आरोपी असलेल्या निदा खानला (8 मे) छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. तिच्या अटकेनंतर आता एक धक्कादायक प्रकऱण समोर आले आहे. निदा खान 40 दिवसांपासून फरार होती. पण संभाजीनगरमध्ये लपून राहण्यासाठी तिला एमआयएम (MIM) चे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आता मतीन पटेल यांनाही नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसली होती. या काळात ती नगरसेवक मतीन पटेल याच्या संपर्कात आली. मतीन पटेल यांच्याशी संपर्क झाल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरला गेली. दरम्यान मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वीच नारेगाव परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता. याच घरात पटेल यांनी निदा खानला आश्रय दिला.

तपासादरम्यान, निदा खान पटेल यांच्या नारेगाव परिसरातील फ्लॅटमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने संभाजीनगर पोलिसांना ही माहिती कळवली. माहिती मिळताच संभाजीनगर स्थानिक पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिवसा या इमारतीवर पाळत ठेवली. निदा खान या फ्लॅटमध्ये लपून बसल्याची खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेतले.

अटकपूर्व जामीन नाही  (Nashik TCS Conversion Case)

निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत वेैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, नाशिक जिल्हा न्यायलयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका ” आंतरराष्ट्रीय सिंडिकेट” शी संबंधित असल्याचे निरीक्षिण नोंदवत तिचा जामिन अर्ज वारंवार फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांना तिला अटक करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग मिळणार आहे.

दोन आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी  (Nashik TCS Conversion Case)

या प्रकरणातील इतर तीन आरोपी शाहरूख कुरेशी आणि रझा मेमन यांनीही पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर कऱण्यात येणार आहे.

पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर कऱण्यात आला आहे. याशिवाय फिर्यादीला दिलेल्या कथित गुंगीकारक पदार्थांचा स्रोत, बँक व्यवहार, आर्थिक फंडिग आणि संभाव्य नेटवर्क याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

तपासात आणखी खुलास्यांची शक्यता  (Nashik TCS Conversion Case)

निदा खानला अटकेनंतर या धर्मांतरण रॅकेटचे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्री. संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. आर्थिक व्यवहार. संपर्कातील व्यक्ती आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored