Translate :

Sponsored

Mumbai Best Employee Strike, Big News, 2026 : बेस्ट कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेमुदत उपोषण, वेतन-ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन : Mumbai Best Employee Strike Slalary Gratuity Demands Indefinite Hunger Strike

बेस्ट कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेमुदत उपोषण, वेतन-ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन

Mumbai Best Employee Strike : मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी BEST Workers Union ने आज 18 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. वेट लीज कर्मचाऱ्यांना समान वेतन तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी व अंतिम थकबाकी देण्याची युनियनची प्रमुख मागणी आहे.

मुंबई : 18-08-2026 

मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय ॲंड ट्रान्सपोर्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून BEST Workers Union ने (Mumbai Best Employee Strike) आंदोलनाची भूमिका घेतली आहे. युनियनचे महासचिव शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रलंबित वेतन करार लागू करण्याची मागणी (Mumbai Best Employee Strike)

BEST कर्मचाऱ्यांचे दिर्घकाळापासून प्रलंबित असलेले वेतन करार तातडीने लागू करण्यात यावेत, अशी युनियनची प्रमुख मागणी आहे. विशेषतः 2026 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन करारांची अंमलबजावणी करण्याची मागणी कऱण्यात आली आहे. याशिवाय BEST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व सुविधा मिळाव्यात, अशीबी मागणी युनियनने केली आहे.

वेट लीज कर्मचाऱ्यांचीही मुद्दा ऐरणीवर (Mumbai Best Employee Strike)

BEST च्या वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही युनियनने उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्वानुसार वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचा प्रश्न (Mumbai Best Employee Strike)

सेवानिवृत्त BEST कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम थकबाकीची रक्कम वेळेत देण्यात यावी, अशी मागणीही कऱण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवण्यासाठी विलंब होत असल्याचा मुद्द युनियनने मांडला आहे.

BEST च्या आर्थिक परिस्थितीवरही प्रश्न

BEST च्या आर्थिक परिस्थितीवरही प्रश्न

BEST उपक्रमाच्या आर्थिक अडचणींचा मुद्दाही युनियननेही उपस्थित केला आहे. BEST चे कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी कऱण्यात आली आहे.

उपोषण कुठे आणि कधी ? (Mumbai Best Employee Strike)

BESt Workers Union च्या घोषणेनुसार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील 42, केनेडी ब्रिज येथील BEST Workers Union च्या कार्यालयात बेमुदत उपोषणाला सुरूवात होणार आहे.

या आंदोलनात BEST च्या विद्यमान कर्मचाऱ्यांसह वेट लीज बस कर्मचाऱ्यांच्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्याही मांडल्या जाणार आहेत. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored