Thanya Nathan Judge : केरळच्या थान्या नाथन सी. जन्मापासून दृष्टीबाधित असूनही त्यांनी सिव्हिल जज परीक्षा उत्तीरण केली आहे. तसेच त्या देशाच्या पहिल्या महिला दृष्टीहीन न्यायाधीश बनल्या आहेत.
केरळ : 18-08-2026
केरळच्या कन्नुर जिल्ह्यातील राहणाऱ्या थान्या नाथन सी (Thanya Nathan Judge ) यांनी एक वेगळा पराक्रम केला आहे. त्यांचे यश हे प्रत्येक माणसासाठी एक प्रेरणा आहे. जन्मापासून दृष्टीबाधीत असूनही थान्या यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि वकीलीही केली. आता त्यांनी सिव्हिल जज परिक्षेत दिव्यांग श्रेणीतून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्या न्यायिक सेवेत रूजू झाल्या आहेत.
त्या केरळच्या पहिल्या दृष्टीबाधित महिला जज बनणार आहेत. त्यांनी अभ्यास आणि वकालतीच्या काळात ब्रेल लिपी, स्क्रिन-रीडर सॉफ्टवेअर आणि ऑडिओ नोटस यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले शिक्षण आणि कायदेशीर काम पुढे नेले. अशा परिस्थितीत, कन्नूर कोर्टाच्या पहिल्या दृष्टीहीन जज खटले कशा चालवणार हे पहाणे नागरिकांसाठी उत्सूकतेचे ठरणार आहे.
Table of Contents
कन्नूर कोर्टाच्या पहिल्या दृष्टीहीन जज (Thanya Nathan Judge )
धान्या नाथन यांनी कन्नूरच्या तालिपरम्बा येथे वकील म्हणून प्रॅक्टीस केली आहे. आता सिव्हिल जज परिक्षेत दिव्यांग वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाथन यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या जन्मापासून दृष्टीहीन असूनही त्यांनी आपले शिक्षण सामान्य पद्धतीने पुढे चालवले. विशेष शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी 10 वी आणि 12 वीचे शिक्षण सामान्य शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि कन्नूर युनिर्व्हसिटीतून एलएलबी(LLB) केले. युनिर्व्हसिटीमधील त्या एकमेव दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांनी होत्या.
नाथन यांचे कामकाज कसे चालते ? (Thanya Nathan Judge )
जन्मापासून दृष्टीबाधित असल्या तरी थान्या नाथन त्यांच्या न्यायिक कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतात. त्या स्क्रिन-रीडर सॉफ्टवेअर आणि डिक्टेशन सॉफ्टवेअर यांसारख्या सहाय्यक उपकऱणांच्या मदतीने कायदेशीर कागदपत्रे आणि आवश्यक माहिती समजून घेतात. वकील म्हणून काम करतानाही त्या ई-डॉक्यूमेंटस सहजपणे हाताळत असत आणि केसेसशी संबंधित नोटस ब्रेल लिपीत तयार करत असत.
धान्या यांचे म्हणणे आहे की. तंत्रज्ञान इतके पुढे आले आहे की स्क्रिन रीडर आणि डिक्टेशन सारख्या उपकरणांच्या मदतीने न्यायिक कामाचा मोठा भाग हाताळला जाऊ शकतो.
कन्नूर कोर्टाच्या पहिल्या दृष्टीहीन जज खटले कशा ऐकतात ? (Thanya Nathan Judge )
दृष्टीहबाधित असूनही धान्या यांच्यासाठी कायद्याचे शिक्षण आणि केसची तयारी यात तंत्रज्ञान खुप उपयुक्त ठरले. त्या स्क्रिन रीडर सॉफ्टवेअर, ब्रेल आणि ऑडिओ नोटसच्या सहाय्याने कायदेशीर साहित्या वाचायच्या आणि तयारी करायच्या त्यांचे सहकारी वकील के.जी. सुनीलकुमार यांच्या मते, थान्या ई-डॉक्युमेंटस सहज हाताळतात आणि अनेकदा कोर्टात हजरही राहिल्या आहेत. कोर्टाची कारवाई समजून घेण्यासाठी आणि त्यासंबंधित कागदपत्रे हाताळण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञान त्यांना महत्त्वाची मदत करते.
कसे ऐकवणार निकाल ? (Thanya Nathan Judge )
धान्या नाथन निकाल ऐकवण्यासाठी आणि न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्या स्क्रिन रीडर सॉफ्टवेअर आणि डिक्टेशन टुलच्या मदतीने कायदेशीर कागदपत्रे, प्रकरणांशी संंबंधित माहिती आणि आवश्यक साहित्य समजू शकतात. धान्या कायद्याची कलमे लक्षात ठेवण्यातही हुशार आहेत.
थान्या यांनी न्यायिक सेवा परीक्षेची तयारीही स्वतःलाच केली होती आणि ब्रेल लिपीत नोटस तयार केल्या होत्या. मुलाखतीच्या दरम्यान त्यांना हे देखील विचारण्यात आले की, त्या त्यांच्या दृष्टीबाधितेसह न्यायिक काम कसे करतील. त्यांनी स्वतःच्या काम करण्याची पद्धत सांगितली आणि मान्य केले की तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायिक जबाबदाऱ्यां पार पाडल्या जाऊ शकतात.