MSRTC St Bus Update : आजही महाराष्ट्रातील निम्मी जनता ही एसटीच्या लाल परीने प्रवास करते. लोकांसाठी एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित आणि खिसाला परवडणारा असाच असतो. आता या बसने आणखी एका तंत्रज्ञानाला सामावून घेतले आहे, ज्याने प्रवाशांना खुप मोठी मदत होणार आहे. काय बदल करणार आहे एसटी प्रशासन ?
मुंबई : 24/06/2025
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने, म्हणजे लोकांच्या लाडक्या लाल परीने प्रवास करणाऱ्यांसाठी, आता एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही ज्या बसने प्रवास करणार आहात, ती बस कुठपर्यंत पोहोचली आहे, हे जाणून घेता येणार आहे.
लाईव्ह लोकेशन समजणार
एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी एसटीच्या ॲपची सुरूवात होणार आहे. एसटी बसचे लाईव्ह लोकेशन सांगणारे मोबाईल ॲप्लिकेशन येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. लालपरीच्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचं आहे त्याची अचूक वेळ कळणार नाही. या सुविधेमुळे प्रवाशांची सुरक्षिततासुद्धा वाढणार आहे. एकट्याने प्रवास करणाऱ्या मुली महिलांना याचा फायदा होणार आहे.