Translate :

Sponsored

MPSC New Pattern, Good News 2026 : एमपीएसी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल, नवा पॅटर्न होणार लागू : MPSC Radical Changes In The MpSC Examination Pattern

एमपीएसी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल, नवा पॅटर्न होणार लागू.

MPSC New Pattern : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत मोठा बदल करत वर्णनात्मक पद्धत लागू केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर झालेल्या या बदलामुले विश्लेषण क्षमता आणि आकलनावर भर दिला जाणार आहे.

मुंबई : 14-04-2026 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (MPSC New Pattern )गेल्या काही काळात परीक्षा पद्धतीत केलेले महत्त्वपूर्ण बदल, विशेषतः वस्तुनिष्ठ पर्यायाकडून (एमसीक्यू) वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) स्वरूपाकडे झालेली वाटचाल, हा सध्या राज्यभरातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ञांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

युपीएससीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या या बदलांमुळे राज्याच्या प्रशासकीय सेवेचे स्वरूप बदलणार असून, याचा फायदा आणि तोटा यावर आता शिक्षण विभागात मंथन सुरू झाले आहे.

आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी आता ‘वर्णनात्मक पद्धत’ लागू केली आहे. यामध्ये उमेदवारांना केवळ पर्याय निवडायचे नसून, सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतराची नाही, तर त्यांच्या विश्लेषण क्षमतेची आणि वैचारिक स्पष्टतेची चाचणी होणार आहे.

या नवीन पॅटर्नचा कोणाला होणार फायदा ? (MPSC New Pattern )

या नवीन पद्धतीमुले स्पर्धा परीक्षेचे समीकरण बदलले असून, पुढील घटकांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

लाभार्थी गट : फायद्याचे कारण

युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी : एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यासक्रम आता समान झाल्यामुळे एकाच तयारीमध्ये दोन्ही परीक्षा देणे सुलभ होणार आहे.

गंभीर आणि अभ्यासू उमेदवार : केवळ ‘ नशीबवान’ किंवा ‘पाठांतराने’ उत्तरे बरोबर येण्याचे प्रमाण कमी होईल. सखोल ज्ञान असेल्या विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल, असे शिक्षण तज्ञांचे मत आहे.

चांगले लेखन कौशल्य असलेले विद्यार्थी : ज्यांचे मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे आणि जे विचार मांडण्यात प्रभावी आहेत. त्यांना वर्णनात्मक पेपरमध्ये चांगले गुण मिळतील.

प्रशासकीय दर्जा सुधारण्यास मदत : भविष्यात मिळणारे अधिकारी हे केवळ माहिती साठवणारे नसून, धोरणात्मक निर्णय घेणाची क्षमता असेलेल आणि विश्लेषण करणारे असतील.

बदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने : (MPSC New Pattern )

या बदलांमुळे शिक्षण क्षेत्रात चिंताही व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनाची आणि इंग्रजी / मराठी दर्जेदार साहित्याची कमतरता भासते, त्यांच्यासाठी वर्णनात्मक पेपर हे मोठे आव्हान ठरू शकतात.

कोचिंग क्लासचे वाढते महत्त्व : नव्या पॅटर्ननुसार उत्तरांच्या लेखनाचा सराव करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासकडे वळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक भार वाढू शकतो.

वेळेचे नियोजन : जुन्या पद्धतीत वेळ वाचवणे सोपे होते. मात्र, आता 3 तासात पूर्ण पेपर लिहिणे ही एक शारिरिक आणि मानसिक कसरत ठरणार आहे.

महाराष्ट्र प्रशासनाची स्वागर्ताह बदल (MPSC New Pattern )

हा बदल महाराष्ट्र प्रशासनासाठी स्वागर्ताह आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उमेदवार अशाच पद्धतीने निवडला जातो. एखाद्या विषयावर सर्वांगीण विचार करून चिकित्सक पद्धतीने विचार करून मुद्देसूद मांडणी करणे ही प्रशासनाचीसुद्धा गरज आहे. भविष्यात अशा पद्धतीची परीक्षा पद्धत असेल तर प्रशासनास याचा फायदा होईल असे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले. एमपीएससीमधील हे बदल ‘गुणवत्तेला प्राधान्य’ देणारे आहेत, असे तज्ञांचे मत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored